शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वरठी येथे आठवडी बाजाराला प्रारंभ होताच उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 5:00 AM

वरठी येथील आठवडी बाजार गावाच्या मध्यभागी भरतो. बाजाराच्या चारही बाजूला दाट लोकवस्ती आहे. मोहाडी तालुक्यातील सर्वाधिक मोठा आठवडी बाजार म्हणून वरठी प्रचलित आहे. परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकाचा थेट व्यावसायिक सबंध वरठी गावाशी असल्याने बाजारात गर्दी असते. लॉकडाउनपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सदर आठवडी बाजार बंद होता.

ठळक मुद्देनागरिकांचा प्रशासनावर रोष : बाजार परिसरातील नागरिकांत दहशत, शासन प्रशासनाच्या नियमांना बगल

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : चार महिन्याच्या बहुप्रतीक्षेनंतर गुरुवारपासून मोहाडी तालुक्यातील वरठी येथील आठवडी बाजार ठराविक जागेवर भरला. सकाळपासून आठवडी बाजारात दुकान लावण्यासाठी गर्दी होती. गावातील व नजीकच्या भागातील दुकानदार जागा पकडण्यासाठी धडपडताना दिसले. ठराविक जागेवर आठवडी बाजार भरणार असल्याने अनेकांना उत्सुकता होती. बाजारामुळे परिसरात रौनक वाढली. पण बाजारात येणारे ग्राहक व दुकानदार कोणतेही नियम पाळताना दिसले नाही. बाजारात सामाजिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडालेले दिसले.वरठी येथील आठवडी बाजार गावाच्या मध्यभागी भरतो. बाजाराच्या चारही बाजूला दाट लोकवस्ती आहे. मोहाडी तालुक्यातील सर्वाधिक मोठा आठवडी बाजार म्हणून वरठी प्रचलित आहे. परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकाचा थेट व्यावसायिक सबंध वरठी गावाशी असल्याने बाजारात गर्दी असते. लॉकडाउनपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सदर आठवडी बाजार बंद होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लक्षात घेऊन चार महिन्यांपासून सदर आठवडी बाजार बंद होता. बाजार ठराविक जागेवर भरणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनामार्फत नागरिक व दुकानदारांना देण्यात आली. यामुळे असलेली उत्सुकता गुरुवारी रोषात दिसली. बाजारात सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाय स्थानिक प्रशासनाने केलेले दिसले नाही.गावाचे मोठ्या झपाट्याने विस्तारीकरण झाले आहे. त्या प्रमाणात आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्याची संख्या वाढली. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने बाजाराची जागा अपुरी पडते. यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त दुकाने रस्त्यावर भरतात. आठवडी बाजारापासून ते ग्रामपंचायतपर्यंतच्या एक किमी अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकाने लावण्यात येतात. यामुळे या भागात राहणाºया नागरिकांना रहदारीचा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुर्तफा दुकाने थाटल्याने या रस्त्यावरून पाय काढणे मुश्किल होते.आठवडी बाजारात नियमित साफसफाई होताना दिसत नाही. बाजाराच्या आदल्या व दुसºया दिवशी थातूरमातूर सफाई केली जाते. सध्या सर्वत्र कोरोनाचे प्रभाव वाढत आहे. बाजाराच्या परिसरात दाट वस्ती असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहे.लॉकडाउन घोषित झाले तेव्हापासून सदर आठवडी बाजार नेहरू वॉर्ड स्थित खुल्या पटांगणावर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री संत जगनाडे चौक आणि रेल्वे स्टेशन मार्गावर भरत होते. ही जागा प्रशस्त असल्याने सामाजिक अंतराचे नियम आपसूक पाळल्या जात होते. त्याबरोबर विस्तारलेल्या वस्तीतील नागरिक सोयीनुसार आपल्या भागातील बाजारात जाऊन खरेदी करायचे.आठवडी बाजार भरत असलेल्या भागात दुकानांना पुरेशी जागा नसल्याने समस्या वाढल्या आहेत. चार महिन्याचा प्रतीक्षेनंतर बाजार भरले खरे पण परिस्थितीचा भान ठेवता होणारे व्यवहार भविष्यात संकट वाढवणारे आहे.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जावरठीचा आठवडी बाजार गर्दीने फुल्ल असतो. चार महिन्यापासून विविध भागात बाजार भरत असल्याने गर्दीचा प्रश्न उद्भवला नाही. संपूर्ण बाजार एकाच ठिकाणी भरल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसले. कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळताना दिसले नाही. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला दिसले. काही काळ पोलीस कर्मचाऱ्यांनी बाजारात फिरून दुकानदार व ग्राहकांना मास्क वापरून गर्दी नाकारण्याच्या सूचना दिल्या. पण पोलीस कर्मचारी गेल्यावर बाजारात असलेले दुकानदार व ग्राहक सैरवैर वावरताना दिसले. स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.आठवडी बाजाराच्या चारही बाजूला दाट लोकवस्ती आहे. वरठी येथे एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण आठवडी बाजार परिसरातून होता. दाट लोकवस्ती व त्यात वाढल्याने गर्दीने या भागातील नागरिकात कमालीचा रोष पाहावयास मिळाला. आठवडी बाजार भारण्याबाबत काही लोकांची पसंती होती. पण नापसंती दर्शवणाºया नागरिकांची संख्या अधिक आहे. सुरक्षेचे उपाय न करता बाजार भरवल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर अनेकांनी रोष व्यक्त केला. कुणाच्या परवानगीने बाजार भरवण्यात आले याबाबत शासकीय आदेश शोधणांºयाची संख्या अधिक दिसली. गुरुवारी दिवसभर याविषयी चर्चा रंगल्या होत्या.लॉकडाउनच्या काळात भाजीपाला विक्रेत्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हातचे काम गमावणाºया अनेकांनी आपला मोर्चा भाजीपाला विक्रीकडे वळवला आहे. पारंपरिक भाजी विक्रेते व नव्याने वाढ झालेली भाजी विक्रेता यांच्या संख्येच्या तुलनेत आठवडी बाजारात निम्मी जागा नाही. आठवडी बाजार ठराविक जागेवर भरणार असल्याने दुकानदारांनी जागा पकडण्यासाठी बाजारात धाव घेतली. मिळेल तेथे आपले बस्तान मांडण्यात आले. दरम्यान त्या जागेवर जुन्या दुकानदारांनी आपला दावा ठोकल्याने सकाळपासून बाजारात फ्री स्टाईल सुरु होते. अनेक दुकानदारांत हाथपाई होताना दिसली.

टॅग्स :Marketबाजार