लोकमत न्यूज नेटवर्कपवनी/आसगाव : घरावरून गेलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने एका ३३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील मोहरी येथे रविवारला सकाळी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोहरी गावात शोककळा पसरली आहे.प्रमोद भाष्कर लांजेवार (३३) असे मृतकाचे नाव आहे. लांजेवार यांच्या घराला लागून उच्च वीज दाबाच्या तारा गेलेल्या आहेत. दरम्यान रविवारला सकाळी दात घासण्याचा निमित्ताने तो घराच्या गच्चीवर गेला असता त्याचा या तारांना स्पर्श झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पवनीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे हे घटनास्थळी दाखल जावून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पवनी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला.त्याच्यामागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा आईवडील व लहान भाऊ असा परिवार आहे. कमावता मुलगा गेल्याने कुटूंबांवर आघात झाला आहे. या घटनेमुळे मोहरी गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पवनी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. यासंदर्भात विद्युत विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता याबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले.
तारांच्या स्पर्शाने तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:44 PM
घरावरून गेलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने एका ३३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील मोहरी येथे रविवारला सकाळी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोहरी गावात शोककळा पसरली आहे.
ठळक मुद्देमोहरी येथील घटना : गावात शोककळा