भंडारा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरी ४२.८ मि. मी. पाऊस अधिक पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ४४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत २२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत केवळ १०.७३ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात १८ हजार २७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १६ हजार १३६ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ८८.२९ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात २,४६१ हेक्टर, पवनी २,१०० हेक्टर, मोहाडी २,७९३ हेक्टर, तुमसर २,९४०, साकोली १,६९४, लाखांदूर २,४०८ तर लाखनी तालुक्यात १,७४० हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी ७ हजार हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखांदूर तालुक्यात असून १,८८६ हेक्टर आहे. भंडारा २९ हेक्टर, मोहाडी २०, तुमसर ९०, पवनी १,७७५, साकोली १,४८७, लाखनी १,७१३ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. तुर ८,५९० हेक्टर, उडीद २१, तीळ १२१, सोयाबिन ९१३, हळद ३१०, भाजीपाला ७४०, ऊस ९०५, कापूस ४८८ व इतर पिके ७८.११ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. आजघडीला शंभर टक्के पेरणी होण्याची गरज होती. परंतु पावसाच्या विलंबाचा फटका बसला. (नगर प्रतिनिधी)रोवणीला प्रारंभ, मजुरी दुप्पटजिल्ह्यात एक लाख ८२ हजार ७६२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ३,३११ हेक्टर क्षेत्रात रोवणी लागवड केलेली आहे. त्याची टक्केवारी १.८१ टक्के एवढी आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, अशांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. मजुरांची मजुरी कडाडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ बियाने खते किटकनाशके यांच्या भावात कमालीची वाढ झाली आहे़
१ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली
By admin | Published: July 17, 2016 12:17 AM