पालोरा (चौ.) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच अनिता संदीप गिऱ्हेपुंजे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पालोरा येथे विषेश सभा घेऊन गावकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली.
नेहरू वाॅर्ड येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य देवानंद खोपे यांनी केले. आंबेडकर वाॅर्ड येथील ध्वजारोहण ज्योती शहारे यांनी केले. जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास सुपार यांनी केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात गावातील कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालय, पालोरा येथे सत्कार करण्यात आला.
तलाठी विवेक वासनिक यांनी कोरोना काळात शेतकऱ्यांना त्रास न होता योग्य पद्धतीने आपले कर्तव्य व जबाबदारी पार पडली. त्याबद्दल सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. गावातील लाईनमन सुरज आघाव यांनीसुद्धा कोरोना काळात आपली कर्तव्य व जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळून गावात वेळोवेळी कार्य केले. त्याबद्दल उपसरपंच दुर्गा कावळे यांनी त्यांचा सत्कार केला.
गावात वेळोवेळी शासनाच्या निर्णयाबाबत जनजागृती करून माहिती देण्याचे कार्य केले, त्याबद्दल विनायकराव फुंडे यांनी महेश चोपकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. गावातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे काम योग्य पध्दतीने केल्याबद्दल पोलीसपाटील श्रीहरी गिऱ्हेपुंजे यांचा माजी सरपंच पुरूषोत्तम गिऱ्हेपुंजे यांनी सत्कार केला. गावातील लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकून गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे व सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
कोरोना काळात कुठलीही ग्रामसभा, सभा घेता येत नाही, तरीसुद्धा गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न केले. भंडारा पवनी रोड नाली बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेत कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी यांनी तात्पुरती पाणी निघण्याची व्यवस्था करून देतो, असे आश्वासित केले. गावात सांडपाणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, रोड नाल्यांची समस्या अशा अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत सचिव होमेश्वर लंजे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद खोपे, कैलास दिघोरे, उषा काजरखाने, रवीता धारगावे, ताराचंद गिऱ्हेपुंजे, सुनीता मस्के, गावातील युवा प्रमुख राहुल बागडे, दुर्याेधन फुंडे, राजेश काजरखाने, देविदास मथुरकर, अभिमन सुपारे, विजय साठवणे, विलास गिऱ्हेपुंजे, दिलीप धारगावे, सचिन कावळे, मनोज धाबेकर, गंगारम ठवरे, रवींद्र खोपे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.