आॅनलाईन लोकमतभंडारा : जोपर्यंत मराठीतील बोली जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. मात्र बोलीला कमी लेखले जात आणि प्रमाणभाषेला जास्त महत्व दिले जाते. मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झालीत. पण त्या भाषेतील चांगुलपणा मराठीने स्वीकारला. विविध भाषेतील शब्द मराठीने स्वीकारले. खºया अर्थाने मराठी भाषा सहिष्णू आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा.भगवंत शोभणे यांनी केले. ते सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात केले.विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा, सार्वजनिक वाचनालय भंडारा व युगसंवाद वाङ्मयीन आणि सांस्कृतिक चळवळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.भगवंत शोभणे, डॉ.जयंत आठवले, अमृत बन्सोड उपस्थित होते. कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मराठी भाषा वर्तमान आणि भविष्य या विषयावर प्रा.भगवंत शोभणे यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले. याप्रसंगी डॉ.जयश्री सातोकर, हर्षल मेश्राम, विवेक कापगते, मनोज केवट, मंगला डहाके यांनी मराठी गौरव कवितांचे अभिवाचन केले. प्रा.रेणुकादास उबाळे यांनी वारकरी, महानुभाव संप्रदायापासून आजपर्यंतच्या सर्व संत व साहित्यिकांसोबतच सामान्य माणसांनी मराठी भाषेच्या संवर्धनसाठी दिलेल्या योगदानाचे महत्व सांगितले.अमृत बन्सोड यांनी विविध साहित्य प्रकारांनी मराठी भाषा कशी समृद्ध होत गेली याचा आलेख मांडला. डॉ.जयंत आठवले यांनी कुसुमाग्रजांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणातून डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी मराठी भाषेचे श्रेष्ठत्व पटवून दिले.संचालन प्रा.नरेश आंबीलकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रमोदकुमार अणेराव यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.संतोष जाधव, प्रा.सुमंत देशपांडे, बासप्पा फाये यासह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक वाचनालयाच्या सर्व कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले.
बोलीमुळे भाषा जिवंत राहते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 11:07 PM
जोपर्यंत मराठीतील बोली जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. मात्र बोलीला कमी लेखले जात आणि प्रमाणभाषेला जास्त महत्व दिले जाते. मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झालीत. पण त्या भाषेतील चांगुलपणा मराठीने स्वीकारला.
ठळक मुद्देभगवंत शोभणे : सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन