शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

ओव्हरटेकच्या नादात एसटी बसने घेतला तरुणाचा बळी; भंडारा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 4:01 PM

करचखेडाची घटना : दुचाकीस्वार जागीच ठार

भंडारा : दुपदरी राष्ट्रीय महामार्गावर एका टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव एसटीने समाेरू येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना भंडारालगतच्या करचखेडा येथे साेमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

तरुण भंडारा तालुक्यातील चांदाेरी येथून शहापूर येथे जात असताना हा अपघात घडला. या अपघाताने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली हाेती. सुनीत साेमेश्वर मेश्राम (२१, रा. चांदाेरी मालीपार, हल्ली मु. शहापूर, ता. भंडारा) असे मृताचे नाव आहे. ताे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत हाेता.

सुनीत सोमवारी काही कामानिमित्ताने चांदोरी येथे आला हाेता. तेथून ताे दुचाकीने एम. एच. ३६, ई. ६३७५ ने शहापूरकडे जात हाेता. राष्ट्रीय महामार्गावर करचखेडा फाट्यासमाेर त्याचवेळी भंडारा आगाराची नागपूर- गाेंदिया एसटी बस (एम.एच. १४, बीटी ४९७५) एका टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हाेती. त्यावेळी समाेरून आलेल्या सुनीतच्या दुचाकीला जबर धडक दिली. सुनीत बसखाली येऊन जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती हाेताच कारधा पाेलीस आणि महामार्ग पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थाेरात यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला. अपघाताने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली हाेती. पाेलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी एसटी बसचालक अमित माेहबे याच्याविरुद्ध कारधा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच वर्षांपूर्वी झाला हाेता आई-वडिलांचा मृत्यू

सुनीतच्या आईचा पाच वर्षांपूर्वी दिव्यामुळे जळाल्याने मृत्यू झाला हाेता. तर आईच्या मृत्यूने खचलेल्या वडिलांचाही अवघ्या सहा महिन्यांत मृत्यू झाला. त्यामुळे सुनीत आणि त्याचा लहान भाऊ पाेरके झाले. चांदाेरी येथून ते शहापूर येथे असलेल्या आपल्या माेठ्या आईच्या घरी राहत हाेते. साेमवारी ताे काही कामानिमित्त आला आणि अपघातात त्याचा बळी गेला. या घटनेने चांदाेरी आणि शहापूर येथे हळहळ व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा