लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासनाच्या विविध विभागाअंतर्गत येणाºया विविध योजनेतील सर्व रक्कम ३१ मार्चपर्यंत खर्च करा. अन्यथा वेतन वाढ रोखणार असल्याची तंबी उर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली.तुमसर येथील नगर परिषदच्या प्रांगणात आयोजित ४२ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, अरविंद कारेमोरे, न.प. उपाध्यक्षा कांचन कोडवानी, सभापती सुनील पारधी, पंकज बालपांडे, राजू गायधने, किरण जोशी, तारा गभणे, नगरसेवक मेहताब ठाकुर, सचिन बोपचे, रजनिश लांजेवार, शाम धुर्वे, सलाम शेख, राजेश ठाकुर, किशोर भवसागर, प्रमोद घरडे, वर्षा लांजेवार, छाया मलेवार, शीला डोये, अर्चना भुरे, भारती धार्मीक, खुशलता गजभिये, स्मिता बोरकर उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, येणाऱ्या काळात शाश्वत वीज देणार असल्याचा मानस असून एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर ही योजना राबविणार आहोत. नव्यानेच पालकमंत्री पांदन योजनेचा शासन निर्णय अपलोड झाला आहे. सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन गावाचा विकास करावा.प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले. त्यांनी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगून शहरवासीयांना दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. न.प. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यालाही भविष्यात घरकुल उपलब्ध करून देणार आहे.खासदार मधुकर कुकडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना वीज मिळाली पाहिजे, अन्न मिळाले पाहिजे व सर्वांचा हाताला काम मिळाले पाहिजे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.आमदार चरण वाघमारे यांनी शासनाच्या कार्यशैलीचे कौतूक करून मुख्यमंत्र्यांनी तुमसर शहराला १५० कोटी रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता सुरु असल्याचे सांगितले. संचालन चंद्रकांत भट यांनी केले. आभार जगदीश ठाकरे यांनी मानले.
मार्चपर्यंत योजनांची सर्व रक्कम खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 9:40 PM
शासनाच्या विविध विभागाअंतर्गत येणाºया विविध योजनेतील सर्व रक्कम ३१ मार्चपर्यंत खर्च करा. अन्यथा वेतन वाढ रोखणार असल्याची तंबी उर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. तुमसर येथील नगर परिषदच्या प्रांगणात आयोजित ४२ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : तुमसर येथे ४२ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन