लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. दिवसभर रस्ते निर्मनुष्य होते. गत आठवडाभरापासून जिल्हा प्रशासनाने स्टेप बाय स्टेप दारु दुकानांसह अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता. त्याची फलश्रूती बंदच्या यशस्वी रुपाने समोर आली.गुरुवारपासूनच शहरातील पानठेले, टपरी, बिअरबार, वाईन शॉप, बार अँड रेस्टारंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल सह पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर होती. ही भूमिकाही उत्तमरित्या बजावण्यात आली. शुक्रवार व शनिवारीही जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेत जिल्ह्यात १४४ कलम लागू केले. तसेच ५५ वर्षावरील शासकीय कर्मचाऱ्यांना वर्क फार्म होमचे आदेश दिले. याच दिवशी भंडारा, पवनी क्षेत्रातही मनाई आदेश लागू करण्यात आला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रहदारीत मार्गदर्शक तत्वे सूचविण्यात आली होती. रविवारी जनता कर्फ्यू असल्याने अनेक नागरिकांनी शनिवारीच महत्वपूर्ण व जीवनावश्यक साहित्यांची खरेदी केली होती.दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत किंवा तक्रारीबाबत व्हॉटस्अॅपवर किंवा लेखी स्वरुपात तक्रारी द्याव्यात असे आदेशही उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तीनही महसूल विभागात देण्यात आले होते. त्याचीच परिणती म्हणून रविवारी जनता कर्फ्यूला चांगलाच प्रतिसाद मिळाला. गत चार दिवसांपासून याचा जणू सरावच सुरु असल्याने रविवारीही प्रशासनाला फक्त निगरानी ठेवण्यापुरतेच कार्य शिल्लक असल्याचे जाणवले. एकंदरीत या बंदलाही नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य करीत कोरोना संसर्गाचा प्रतिबंध घालण्यावर एकजुटीचा प्रत्यय दिला.सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागरिकांनी घरासमोर उभे राहून टाळ्या व ताट वाजवून आरोग्य, पोलीस व अत्यावश्यक सेवेत महत्वपूर्ण भूमिका बजाविणाºया अधिकारी व कर्मचाºयांचे कौतूक केले.दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी दुपारी काढण्यात आलेल्या पत्रकात जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झालेली नव्हती. विदेशातून आलेल्या १४ पैकी नऊ जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. विद्यमान स्थितीत होम क्वारंटाईनमध्ये १३ जण तर नर्सिंग होम क्वारंटाईनमध्ये १४ जणांना दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. एकंदरीत जिल्ह्यात २७ जणांवर या संबंधाने नजर ठेवण्यात आली आहे.दरम्यान दिल्लीत संसदीय अधिवेशन काळात संसदीय समितीच्या मिटींगमध्ये कोरोना संशयीतांच्या संपर्कात आल्याने भंडारा येथे परतल्यावर खासदार सुनील मेंढे यांनी स्वत:हून वैद्यकीय चाचणी करून घेतली होती. आज या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याचेही सांगण्यात आले आहे. ते घरातच अलगीकरण कक्षात राहणार असल्याचेही खासदार मेंढे यांनी कळविले.भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साद देत जिल्हावासीयांनी जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के प्रतिसाद दिला. जिल्हाभरातील व्यापारी प्रतिष्ठाने यासह वाहतूकही पूर्णपणे बंद होती. जिल्हा प्रशासनासह पोलीस विभागाची याकडे करडी नजर होती. वृत्त लिहिपर्यंत कर्फ्यूदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. सकाळी ७ वाजतापासूनच वॉर्डांसह जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. रुग्णालय व आवश्यक सेवा वगळता नागरिक रस्त्यावर दिसून आले नाही. रस्ते सर्वत्र निर्मनुष्य होते. राज्य मार्गांसह राष्ट्रीय महामार्गावरही शुकशुकाट जाणवला. पोलिसांचा ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त होता.जनता कर्फ्यू यशस्वीराज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कार्य हाती घेतले होते. स्टेप बाय स्टेप सर्व आदेश काढण्यात आले होते. शाळा, महाविद्यालय, व्यापारी प्रतिष्ठाने यासह अन्य निर्णय व आदेश देण्यात आल्यामुळे रविवारचा जनता कर्फ्यू हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी झाला.-एम.जे. प्रदीपचंद्रन,जिल्हाधिकारी, भंडाराअनुचित प्रकार नाहीप्रधानमंत्री यांच्या आवाहनानंतर जिल्ह्यात बंद बाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. संवेदनशील क्षेत्रासह सर्वच ठिकाणी करडी नजर ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात जनता कर्फ्यू दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. नागरिकांचे सहकार्य लाभले.-अरविंद साळवे,जिल्हा पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM
गुरुवारपासूनच शहरातील पानठेले, टपरी, बिअरबार, वाईन शॉप, बार अँड रेस्टारंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल सह पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर होती. ही भूमिकाही उत्तमरित्या बजावण्यात आली. शुक्रवार व शनिवारीही जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेत जिल्ह्यात १४४ कलम लागू केले.
ठळक मुद्देअनुचित घटना नाही : एकजुटीचा प्रत्यय, आवश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद