लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सार्वजनिक उपक्रमातील सार्वजनिक हे शब्द फक्त नावापुरते आढळते. मनोरंजनाचे उपक्रम सोडल्यास इतर सार्वजनिक उपक्रमात आयोजक व्यतिरिक्त लोकसहभाग नगण्य दिसते. यामुळे समजोपयोगी कार्यक्रमांना खीळ बसली आहे. पण वरठी येथे आयोजित रक्तदान शिबिर याबाबत अपवाद दिसले.शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याचे लक्षात घेऊन वरठी येथील युवकांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला. यात सर्वस्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उष्णेतेने पारा चढवलेल्या काळात रक्तदान चळवळीत ४२ जणांनी रक्तदान केले. यात कुठलाही श्रेष्ठवाद नव्हता तर प्रत्येकाची रक्तदान करण्यासाठी असलेली धडपड तेवढी झळकत होती.कार्यक्रमाचे आयोजन सेवा फाउंडेशन वरठी, खुशी फाउंडेशन भंडारा, बजरंग दल व लायन्स क्लब भंडारा, ब्रास सिटी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने व रेल्वे सुरक्षा दल व कर्मचारी यांच्या यांच्या सहकार्याने घेण्यात आले. आयोजक कोण आणि कुठं याचा विचार न करता युवकांच्या हाकेला प्रतिसाद देत सर्वस्तरावरून उत्स्फूर्त प्रतिवाद या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे भाग दिसले. रक्तदान शिबिरात रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस ठाणे कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, आयोजक मंडळाचे सदस्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदवला होता.रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्वेता येळणे, लायन्स क्लबचे सेवक कारेमोरे, पोलीस निरीक्षक एस. बी. ताजने, उपनिरीक्षक विवेक राऊत, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, माजी उपसरपंच मनोज सुखानी, पोलीस पाटील लता सपाटे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी येळणे, योगेश हटवार, संदीप बोंदरे, ग्रामपंचायत माजी सदस्य मनीषा मडामे, सेवा फाउंडेशन अध्यक्ष पंकज सपाटे, खुशी फाउंडेशन अध्यक्ष राजेश राऊत, स्टेशनमास्टर मुरमु, लायन्स क्लबचे धनराज साठवणे, रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ. हितेंद खांडेकर उपस्थित होते.यावेळी रक्तदान करणाऱ्या युवकांना टी शर्ट वाटप करण्यात आले. खुशी फाऊंडेशनच्या वतीने प्रमुख पाहुणे व आयोजक मंडळाच्या सदस्यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला कोमल वाघमारे, कुणाल टाले, रुपेश सपाटे, चेतन बन्सोड, शमशाद अंन्सारी, श्रीकांत माटे, अरविंद येळणे, सागर कहु, चिन्मय दत्तात्रे, दिपक कुंभरे, मुकेश कोपरकर, राजेंद्र माटे, सागर कडव, अंकित भुरे, रवी माकडे, गुरुदेव पुंड, आकाश रहांगडाले, मयूर पारधी, वैभव जिडेवार, अक्षय पांडे, अविनाश शेंडे, रूपचंद शेंदरे उपस्थित होते.
रक्तदान चळवळीकरिता सर्वस्तरावरून उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:36 AM
सार्वजनिक उपक्रमातील सार्वजनिक हे शब्द फक्त नावापुरते आढळते. मनोरंजनाचे उपक्रम सोडल्यास इतर सार्वजनिक उपक्रमात आयोजक व्यतिरिक्त लोकसहभाग नगण्य दिसते. यामुळे समजोपयोगी कार्यक्रमांना खीळ बसली आहे.
ठळक मुद्देवरठी येथे रक्तदान शिबिर : ४२ युवकांनी केले रक्तदान