शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

सखी महोत्सवात सखींचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:28 PM

लोकमत सखी मंच साकोलीच्यावतीने भारत सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसाकोली सखी मंचचे आयोजन : सखींनी सादर केले एकाहून एक सरस नृत्य, बहारदार नृत्याने मिळविली उपस्थितांची दाद

आॅनलाईन लोकमतसाकोली : लोकमत सखी मंच साकोलीच्यावतीने भारत सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी खासदार नाना पटोले, साकोलीच्या उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, नगराध्यक्ष धनवंता राऊत, मानवाधिकार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी, प्रदेश महिला अध्यक्षा ममता भोयर, शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा निलमा वालके, केवटे, अर्चना निंबार्ते, छाया पटले, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उके, अखिलेश गुप्ता उपस्थित होते.या कार्यक्रमात सखींनी विविध कला सादर केल्या. यामध्ये बाम्पेवाडा ग्रुपच्या महिलांनी शेतकरी नृत्याचे उत्तम प्रदर्शन करून सर्व पाहुण्यांची वाहवा मिळविली. उद्घाटनप्रसंगी सौम्या गुप्ता व स्नेहा कुळकर्णी यांच्या ‘नमो शिवशंकरा’ या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.एकल नृत्यामध्ये प्रथम क्रमांक नीलिमा कोडापे यांच्या मला जाऊ द्या या लावणीने द्वितीय संगीत पेंदाम यांच्या ‘प्रेमरतन धन पायो’ तर तृतीय प्रणिता तिडके यांच्या ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या नृत्याला मिळाला.युगल नृत्यामध्ये रिना चौधरी व दुर्गा निखाडे यांच्या ‘चने के खेत में’ नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. तनुजा हत्तीमारे व लता साखरवाडे यांच्या युगल नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. सामूहिक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक भारती सोनवाने यांच्या नृत्याने, द्वितीय दिपा करंबे यांच्या रंग दे बसंती तर तृतीय क्रमांक जादूची झप्पी यांच्या ग्रुपच्या पल्लो लटके या रिमीक्स नृत्याने पटकाविले. नृत्यांमध्ये एकापेक्षा एक असे सादरीकरण करण्यात आले.संगीता खुणे व पुष्पा कापगते यांच्या माऊली या नृत्याने जणू पंढरपूरचे दर्शन घडविले. अशा या अप्रतीम कार्यक्रमाचे परिक्षण नितू वासू गुप्ता व सुषमा कापगते यांनी केले. दुर्गा निखाडे, शामकला गडमडे, तनुजा हत्तीमारे, कल्पना नेवारे, भारती व्यास, वैशाली पाटील, उषा लांजेवार, कविता कांबळे, आरती तरजुले, स्वाती शहारे, स्नेहलता राऊत, दिव्या राऊत, संगीता चांदेवार ग्रृप बांपेवाडा महिला ग्रृप तसेच वडद, पळसगाव, परसोडी, बांपेवाडा, सानगडी, धर्मापूरी येथील महिलांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व वॉर्ड संयोजिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुचिता आगाशे यांनी तर संचालन रजनी राखडे यांनी केले.यावेळी माजी खासदार नाना पटोले, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी व ममता भोयर यांनी ‘लोकमत सखी मंच’ हे महिलांसाठी व्यासपीठ असल्याचे भाषणातून सांगितले. या कार्यक्रमासाठी शालू नंदेश्वर, रिता बोकडे, आभा खोटेले, मिनाक्षी आकनूरवार, लता द्रुगकर, रिता राऊत, दिपा करंबे, तृप्ती भोंगाडे, कला हटवार,प्रतिभा टेंभरे, ज्योत्स्ना रंगारी, कुंदा गायधने यांनी सहकार्य केले.