मॅरेथॉन स्पर्धेला आमदार राजू कारेमोरे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात, रंजिता कारेमोरे, फिटनेस अकॅडमीचे संचालक माजी सैनिक दिलीप बावनकुळे, माजी सैनिक विजय पटले, सरपंच श्वेता, उपसरपंच सुमित पाटील, माजी सरपंच संजय मिरासे, अनिल काळे, एकलरीचे माजी सरपंच एकनाथ फेंडर, उद्योजक माणिक शहारे, अरविंद येळणे, पंचायत समिती सदस्य आकांक्षा वासनिक, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, योगेश हटवार, माजी सरपंच दिलीप गजभिये, तंटामुक्त समिती अध्यक्ष मिलिंद धारगावे, रितेश वासनिक, संगीता सुखानी, कविता गायधने, संगीता बडवाईक उपस्थित होते.
महिला व पुरुष गटाकरिता स्वतंत्र पारितोषिक ठेवण्यात आले होते. पुरुष गटाकरिता पाच कि.मी. व महिला गटाकरिता तीन किमी अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली. दोन्ही गटांत स्पर्धकांनी प्रचंड हजेरी लावली. पुरुषापेक्षा महिला गटात स्पर्धकांची संख्या जास्त होती. सर्व यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीस व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरुष गटात लिलाराम बावणे व महिला गटातून तेजस्विनी लांबखाने हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आकाश लांजेवार व गीता चोपकर द्वितीय पुरस्कार व शालिनी साकुरे तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.
संचालन श्रुती लांजेवार, प्रास्तविक दिलीप बावनकुळे व आभार प्रदर्शन शानुकुमार तांबेकर यांनी मानले. यावेळी चेतन डांगरे, ओंकार लेंडे, परेश कारेमोरे, शैलेश भारतकर, सचिन फुलबांधे, माजी सैनिक शरद हटवार, स्वीटी डांगरे, अश्विनी भारतकर, अश्विनी बावनकुळे, दीपिका पटले, स्वाती फुलबांधे, वैद्य, निखिल कांबळे उपस्थित होते. श्रुती लांजेवार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन शानू कुमार तांबेकर यांनी केले.