: कोरोना वैश्विक महामारी नियंत्रित करण्याकरिता शासन स्तरावरून पुरविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागाच्या मदतीने लसीकरण मोहीम सुरू आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच संगीता घोनमोडे व पदाधिकारी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या घरातूनच लसीकरणाचा आरंभ करीत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.
लाखनी तालुक्यातील मचारणा येथील आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कोविड नियंत्रण लसीकरण सुरू झाले आहे. शिक्षक यादव घोनमोडे यांनी लसीकरण केले आहे.
लसीकरणाशिवाय कोरोना नियंत्रित होणे शक्य नसल्याची बाब अभ्यासातून पुढे आलेली आहे. त्यामुळे जगभरातून लसीकरणाला गती मिळत आहे. आपल्याही देशात लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू असले तरी सरासरी आकडेवारी अत्यल्प आहे. ग्रामीण भागात लसीकरणाच्या विरोधात चुकीची माहिती पसरवत असल्याने जनसामान्य लस घ्यायला पुढाकार घेत नाहीत. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना प्रबोधन केले जात आहे. याकरिता गावातील प्रभावशाली व्यक्ती प्रथम लसीकरण करीत इतरांना प्रोत्साहित करण्याचे काम सुरू आहे. मचारना येथे पहिला टप्पा व दुसरा टप्पा लसीकरणाचा सुरू आहे. कालपर्यंत ७९ व्यक्तीने लसीकरणात सहभाग नोंदविला आहे. याकरिता डॉक्टर सुधीर झलके, परिचारिका सपना तिरपुडे, राजश्री वाघदेवे, आशा सेविका वनिता घोनमोडे, सरपंच संगीता घोनमोडे लसीकरण मोहिमेत सहकार्य करीत आहेत.