वाकेश्वर : पहेला येथील गांधी विद्यालयात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जी. काटेखाये हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये वाय. एन. काटेखाये, प्रा. एस . व्ही. गोंडाणे, क्रीडा शिक्षक डी. बी. टेकाम, प्रा. व्ही. एल. हटवार, प्रा. एस. एस. भुरे, करुणा कावडे, पी. के. गिरडकर हे होते.
याप्रसंगी प्राचार्य डी. जी. काटेखाये यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. कार्यक्रमाच्या औचित्याने क्रीडाशिक्षक डी. बी. टेकाम यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विशद करून सांगितले. सूत्रसंचालन अजय चकोले यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार अनिल बारई यांनी मानले.
कार्यक्रमासाठी एच. बी. दहिवले, लीलाधर कुंभलकर, एम.एस. देशमुख, प्रशांत वाघमारे, दीपक बावणे, सूरजकुंवर मडावी, राधिका खवास, शुभांगी गोंडाणे, मीनल निर्वाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.