आॅनलाईन लोकमतभंडारा : स्प्रिंग डेल शाळेत दरवर्षी आयोजित स्नेहसंमेलनात एका विषयाला अनुसरून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजित करण्यात येते. यावर्षी ‘परिवर्तन’ या विषयावर विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण समतोल, अनिष्ठ सामाजिक रूढींच्या पलीकडील जग तसेच मुल्य संस्कारांची जोपासना या विषयांवरील कलेचे सादरीकरण करण्यात आले होते.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, सत्यम एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष शुभांगी मेंढे, संचालक अजित आष्टीकर, विनय अंबुलकर प्राचार्या अनघा पदवाड उपस्थित होते.यावेळी ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ.परिणीता फुके यांनी अभ्यासासोबत सांस्कृतिक विकास महत्वाचा असल्याचे सांगितले. यावेळी खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या अनघा पदवाड यांनी अहवालवाचन केले. विज्ञान प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते. यामध्ये ६० पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.स्नेहसंमेलनाच्या दुसºया दिवशी शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी या वैज्ञानिक प्रदर्शनीचा आनंद घेतला. या प्रयोगाकरिता नववी व दहावीचे विद्यार्थी तसेच विज्ञान विभागाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. संचालन मेघा हलदुलकर व नीता भोयर यांनी केले. कार्यक्रमासाठी के.जी. प्रमुख कल्पना जांगडे, समृद्धी गंगाखेडकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रिया चौधरी, कविता लोहकरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पालकांनी सहकार्य केले.
स्प्रिंग डेल शाळेचा वार्षिकोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:54 PM
स्प्रिंग डेल शाळेत दरवर्षी आयोजित स्नेहसंमेलनात एका विषयाला अनुसरून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजित करण्यात येते.
ठळक मुद्दे६० हून प्रयोगाचे सादरीकरण : विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद