चैतन्याची नवपालवी: आम्रवृक्ष लागले बहरायला मोहाडी : शिशिरातली वृक्षांच्या पानांची झड थांबली. यातच वसंत ऋतूचे आगमन होत आहे. वृक्षवेली सौंदर्याने फुलायला लागल्या आहेत. नवपालवी वृक्षांना येणार आहे. सुखद तापमानात आम्रबहराचा मंद सुगंध मोहवून घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.निसर्गसखा वसंत ऋतु आणि निसर्ग सौंदर्य याचा अतूट परस्पर सबंध आहे. संतश्रेष्ठ मुक्तेश्वर म्हणतात, पुष्पधुळीमाजी लोळे वसंत या पक्तीत वसंत ऋतु कसा बहरतो हे सांगितले आहे. सौंदर्याची उधळण करणारा वसंत ऋतुचे आगमन फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वसंत ऋतु आपल्या विविधांगी रंगाची उधळण करणार आहे. शिशिर ऋतुतली पतझड थांबली जात आहे. वसंत ऋतुत थंडी कमी होत जाणार आहे. पहाटे थंड वाऱ्याचा मंद झुळका हव्याशा वाटत आहे. वातावरणातील तापमान सुखद वाटत आहे. हळूहळू वातावरणात बदल होणे, बहरणारी फुले, शेत शिवारातली हिरवी पिके मन मोहवून घेत आहेत. पुढच्या मार्च महिना ‘वसंतात्मा’ समजला जातो. रानावनातली पळसवृक्ष बहरुन येतात. पळसबाग लाल आग लागल्यासारखी दिसायला लागतात. यातच आम्रवृक्ष मोहरायला लागला आहे. बारीक फुलांनी आम्रवृक्ष बहरत जात आहे. यात कालावधीत आम्रवृक्ष बहरण्यासोबत कांचन, जांभूळ, करंज, चारोळी, मोह, कोटेसार व शिरीष वृक्ष वसंतात फुलायला आरंभ झालेले आहेत. सोनसावर नावाचा वृक्ष मुख्यत: फेब्रुवारी महिन्यातच फुलतो. महाराष्ट्राचा राज पुष्पतावरण तसेच जारुल, शिवन, अंजन, आपटा, काळापळस, कौशी भोकर असे अनेक वृक्ष वसंतात बहरुन येतात. त्याशिवाय असंख्यवेली व फुलझाडही याच काळात पालावतात अन् सौंदर्यवंत व संताची शोभा वाढवत असतात. फाल्गुणात वसंत रात्री टपोर चांदणे पडतात. या काळात लमंडळीस तरुणांचाही सहभाग होणाऱ्या होळीपर्यंत मंद वाऱ्याची झुळकिते म्हणून जातात. होळीपर्यंत मंद वाऱ्याची झुळकिते म्हणून जातात. होळीपर्यंत मंद चांदण्याचा प्रकाशात खेळाचा सुखद आनंद मिळतो. त्यानंतर ग्रीष्माचा तडाखा सुरु होतो. हा ऋतू भाजून काढतो. मनाला आनंद देणारा व हवाहवाला वाटणारा वसंत ऋतु जीवनात चैतन्याची नवपालवी घेण्यासाठी हळूच येणाची चाहूल देत आहे. सर्वत्र आम्रवृक्ष बहरले आहेत. त्याचा मंद असा सुगंध मनाला आनंद देणार ठरत आहे. क्षणभर आम्रवृक्षाच्या झाडासमीप राहाव व त्या मंद सुगंध मनभर घेत राहाव अस वाटायला लागतो. (तालुका प्रतिनिधी)
वसंत ऋतूची चाहूल अन् आम्रबहराचा मंदसुगंध
By admin | Published: February 03, 2017 12:39 AM