पवनी : तालुक्यातील जुनोना फाट्यावर झालेल्या अपघात प्रकरणी अखेर पवनी पोलिसांनी एसटी बस चालकाला अटक केली. मंगळवारी झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
एकोडी फाट्यावर झालेल्या अपघातात आशिष मनोहर राणे (२५) हा ठार झाला होता तर राजू तलमले आणि कवडु राजभोयर हे दोघे गंभीर जखमी झाले होते. एसटी बसने धडक दिल्यानंतरही एसटी महामंडळाचे अधिकारी एसटी बसने अपघात झाला नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जोपर्यंत एसटी बसचालकावर गुन्हा दाखल होत नाही आणि अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर मंगळवारी उशिरा रात्री चालक अनिल सुरेश लेदे (३५) रा.अड्याळ याला अटक करण्यात आली.