शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

एसटी बस ४० फूट खोल पुलाखाली उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 5:00 AM

राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली.

ठळक मुद्देवरठीच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळ थरार : ३९ प्रवासी सुदैवाने बचावले, कुणाला साधे खरचटलेही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटीबस रेल्वे ओव्हरब्रीज जवळ ४० फुट खोल उतरल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथे घडली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा थरार घडला. बसचालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्वच्या सर्व ३९ प्रवासी सुदैवाने बचावले.राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली. बसमधील सर्व प्रवाशांनी श्वास रोखले, मात्र अशा कठीण प्रसंगातही चालकाने या बसवर नियंत्रण मिळवत सरळ बस खाली उतरविली. यामुळे बसमधील कुणालाही साधे खरचटले नाही, परंतु पाच मिनिटांचा हा थरार प्रवाशांच्या अंगावर काटे आणणारा होता. अपघातातून बचावल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर भीती आणि आनंद दिसत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात घटनास्थळी दाखल झाले. मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दुसºया बसने भंडाराकडे रवाना केले.चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळलातुमसर - नागपूर ही बस चालक संदेश वाहाणे चालवित होते. वरठीचा रेल्वे ओव्हरब्रीज पार करताना अचानक दुचाकीस्वार आडवा आला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली उतरु लागली. समोर खोल दरी दिसत असताना मोठ्या शिताफीने चालक संदेशने बस हाताळली. समयसूचकता वापरून बस सरळ खाली उतरविली. अपघातातून बचावलेल्या प्रत्येक प्रवाशाने चालक संदेशचे मनापासून आभार मानले. 

नशीब बलवत्तर म्हणून वाचलोया बसमध्ये तब्बल ३९ प्रवाशी होते. महिला व लहान मुलांचा सर्वाधिक समावेश होता. तुमसर तालुक्यातील माजी सैनिकाची पत्नी दमयंती तुरकने याही या बसमध्ये प्रवास करीत होत्या. अपघातानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांना अपघाताचा धक्का बसल्याचे जाणवत होते. मात्र एवढ्या मोठ्या अपघातातून आपणच नाही तर सर्वजण वाचल्याचा आनंदही चेहºयावर स्पष्ट दिसत होता. आमचे नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. या अपघातात कुणाला साधे खरचटलेही नाही.

टॅग्स :Accidentअपघात