शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला अहवालभंडारा : विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यासाठी शाळांना दोन महिन्यांपूर्वीच निर्देश देण्यात आले असले तरी जिल्ह्यातील एकाही शाळेने यासंदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल मागितला आहे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सदर परिपत्रक देऊन ३० सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.राज्य शासनाने २१ जुलै रोजी आदेश काढून मुलांचे दप्तर हलके करण्याच्या सूचना दिले आहेत. पालकांनी आणि शाळांनी पुढाकार घेऊन दप्तराचे वजन मर्यादित ठेवण्यासाठी अनेक उपाय सूचविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून शाळांनी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, याचा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे पाठवायचा होता. मात्र, भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही शाळेने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. मागील दोन महिन्यात एकाही शाळेने असा अहवाल पाठविलेला नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्तांकडून शिक्षण संचालकांना आणि शिक्षण संचालकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत जाब विचाला आहे. शिक्षण संचालक महावीर माने यांनी १९ आॅगस्ट रोजी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व शाळांचा अहवाल मागितला होता. परंतु, एकाही विस्तार अधिकारी किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर झाला नाही. त्यामुळे शिक्षण संचालकांनी पुन्हा १५ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अहवालाबाबत माहिती मागितली आहे. त्यामुळे आता दप्तरांच्या ओझ्याचा मुद्दा जिल्ह्यातील शाळांसाठी संवेदनशील झाला आहे. सर्व विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अधिनस्त शाळांचा हा अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत तातडीने पाठवावा, असे निर्देश दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचे दप्तर अधिकाऱ्यांना भारी
By admin | Published: September 25, 2015 12:08 AM