लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पिंपळगाव व खुटसावरी गटग्रामपंचायतीत पिंपळगाव आदिवासी बहुल गाव आहे. यामुळे या गावात ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शासकीय योजनांपासून या गावाला दूर ठेवण्यात येत आहे. याची दखल घेत महाराष्ट्र युवा परिषदेने आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पिंपळगाववासीयांसह युवा परिषदेने खुटसावरी ग्रामपंचायतवर धडक दिली.२४ आॅगस्ट रोजी पिंपळगाव येथे ग्रामसभा घेण्यात आली. पिंपळगाव व खुटसावरी ही गटग्रामपंचायत आहे. पिंपळगाव हे गाव आदिवासी बांधवांचे गाव आहे. मात्र गटग्रामपंचायतीमुळे पिंपळगाव येथे कोणत्याही प्रकारच्या योजना व सुविधा ग्रामपंचायतीने पुरविल्या नाहीत. त्या गावात पाण्याची टंचाई आहे. उन्हाळ्यात त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. या गावाकडे खुटसावरी येथील सरपंच दुर्लक्ष करीत आहेत. पिंपळगाव येथील नागरिकांनी महाराष्ट्र युवा परिषदेच्या सोबत आदिवासी विभागाला आणि उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना महाराष्ट्र युवा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, कार्यकर्ते आणि पिंपळगाव येथील आदिवासी बांधव उपस्थित होते. निवेदनात गावात पाण्याचे जलकुंभ, सोलर लाईट आणि जंगली प्राण्यांपासून घराचे व शेताचे रक्षण करण्यासाठी काटेरी तार लावण्यात यावे अशी मागणी नमूद आहे.ग्रामपंचायतचे सरपंच विजय वासनिक, उपसरपंच सुरेश उईके आणि सचिव एस.एस. हातझाडे हे योजना न देण्यासाठी हस्तक्षेप करीत आहेत. अनेक योजना या आदिवासी विभागाच्या असूनही ग्रामपंचायत मात्र योजना मिळवून देण्यासाठी अपयशी ठरत आहेत. आदिवासी विभागाच्या योजनेत ग्रामपंचायतचा कोणताही हस्तक्षेप चालणार नाही. निवेदन देतेवेळी ग्रामपंचायतमधील एकही अधिकारी मदतीला नव्हते. पिंपळगाव येथील आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र युवा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद येल्लजवार, उपाध्यक्ष आकाश रामटेके, सतीश सयाम, देवीलाल चौराह, सुकराम सयाम, सतीश उईके, कल्पना सयाम व कार्यकर्त्यांनी वसा घेतला आहे.
खुटसावरी ग्रामपंचायतवर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:03 AM
पिंपळगाव व खुटसावरी गटग्रामपंचायतीत पिंपळगाव आदिवासी बहुल गाव आहे. यामुळे या गावात ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देन्यायाची अपेक्षा : आदिवासी बांधवांसाठी महाराष्ट्र युवा परिषद सरसावली