राजेंद्र पटले यांची मागणी : शेतकऱ्यांना सिंचनाची अत्यन्त आवश्यकतातुमसर : अनेक शेतकऱ्यांना घेवून बावनथडी प्रकल्प मोक्यावर जाऊन पाहणी केली असता बावनथडी प्रकल्पाचा सिंचन सुरू करण्यासाठी राजेंद्र पटले यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेत बावनथडी सिंचन प्रकल्प त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली.बावनथडी नदी भरून वाहत आहे. तरी सुद्धा बावनथडी सिंचन प्रकल्पाचे सिंचन देणे बंदच आहे. यावर्षी दुष्काळ पडण्याची जास्त शक्यता दिसत आहे. वेळेवर योग्य तत्परर्ती अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवून, त्वरीत 'एक्टीव्ह' होऊन सिंचन सुरू करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सिंचन देण्याचा प्रयत्न करावे, यासाठी शेतकऱ्यांचे मोर्चे आंदोलनाची वाट कशाला बघावे, असा प्रश्न चर्चे दरम्यान केला.दोन दिवसात आॅगष्ट लागणार आहे. अजुनपर्यंत शेतकऱ्यांना सिंचन मिळाला नाही व कधी मिळणार हे सुद्धा निश्चित नाही आहे. बावनथडी नहरांचे बरेच काम अर्धवट आहे. त्यामुळे अनेक गावांना सिंचन मिळत नाही आहे. अर्धवट काम त्वरीत पूर्ण करावे. ज्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत त्यांचा मोबदला त्वरीत करण्यात यावे अन्यथा उग्र आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान गर्जनेच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा देखील पटले यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिला. (तालुका प्रतिनिधी)
बावनथडी सिंचन प्रकल्प सुरू करा
By admin | Published: July 31, 2015 1:08 AM