लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे. यामुळे गावाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीची वा ग्रामसभेतून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. गावाचे हित जोपासण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना सुद्धा रेतीघाट मालक व काही अधिकाºयांच्या संगनमताने गैरप्रकार सुरु आहे. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दि. ३० नोव्हेंबरपासून माजी जि.प. सदस्य के.बी. चौरागडे यांच्या नेतृत्वात धनराज भोयर, रामभाऊ कुकडे, दादाराम भोयर व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.कान्हळगावातील लोकांना विश्वासात न घेता मुंढरी बुज रेती घाटाचा लिलाव करण्यात आला. परंतु प्रस्तावित मुंढरी रस्त्याचा वापर न करता कान्हळगाव हद्दीतून रेतीचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरु आहे. यासाठी घाटधारकांनी कान्हळगाव ग्रामपंचायतीची मंजुरी घेतलेली नाही. ग्रामपंचायतही प्रकरणी लक्ष न घालता टाळाटाळ करीत आहे. ग्रामपंचायतचे जबाबदार पदाधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. तसेच ग्रामपदाधिकारी संविधानाच्या २४३ व्या घटना दुरुस्तीनुसार पदाचा दुरुपयोग करीत असल्याने व ग्रामसभेच्या अधिकाराचे हनन करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.कान्हळगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी करारनाम्यानुसार कुकडे यांच्या शेतात विहिर खोदण्यात आलेली आहे. योजनेचा संपूर्ण खर्च करातून केला जातो. मात्र मागील आठवड्यापासून या योजनेचे पाणी रेती घाटमालकाला दिले जात आहे. यासाठी ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. बिलाचा भरणा मात्र, ग्रामपंचायतीला करावा लागतो आहे. पाण्याचा गैरवापर थांबवून कारवाई करण्याची मागणी आहे. रेती ठेकेदारांनी रेती डंपींग करण्यासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता सामाजिक वनीकरणाच्या जागेतील झाडांच्या कत्तली केल्या आहेत. त्या जागेचा अनधिकृतरित्या वापर चालविला आहे. यासाठी ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही.पर्यावरणाची हानी केली जात आहे. या प्रकारासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, रेती घाट मालक व काही अधिकारी यांचे संगनमत दिसून येत आहे.
कान्हळगाववासीयांच्या उपोषणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 9:14 PM
मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे.
ठळक मुद्देप्रकरण मुंढरी रेतीघाटातील गैरप्रकाराचे