शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

जम्बो कोरोना हॉस्पिटल तत्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:33 AM

भंडारा : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्यात जम्बो कोरोना हॉस्पिटल तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, ...

भंडारा : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्यात जम्बो कोरोना हॉस्पिटल तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये कोरोना महामारी पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामधून जीवितहानीसुद्धा होत आहे. सध्याची परिस्थिती बघता दररोज हजारांच्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोनाची टेस्ट अजून जर वाढवल्यास प्रत्येक गावागावांमध्ये ५० ते १०० रुग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याची आरोग्य व्यवस्था बघितली तर ती अत्यंत तोकडी असून आज कोरोना रुग्णांसाठी शासकीय रुग्णालय असो अथवा खाजगी रुग्णालये यामध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्यामुळे रुग्णालयांमध्ये जागा नाही, बेड नाही. नजीकच्या काळात कोरोना रुग्णांचा हा आकडा जर फुगला तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. याकरिता जिल्हा प्रशासनाने वेळीच दक्ष राहून उपजिल्हा रुग्णालयांमधून आणि प्रत्येक तालुकास्तरावर कोविड सेंटर उभे करावे. भंडारा शहरात किमान ३०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे करून त्यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ पुरविण्यात यावे. खाजगी रुग्णालयातून कोरोना पेशंट वा त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या लुटीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश डाहारे, संजय रेहपाडे, ललित बोंद्रे, अरविंद पडोळे, गजानन कळंबे, ताराचंद भुरे, संजय मडावी, नत्थू बांते, विनोद पेशने यांचा समावेश होता.