यावेळी तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, शहराध्यक्ष ॲड. मोहन राऊत, विजय सावरबांधे, राकेश राऊत, रहिम मेश्राम, मानबिंदू दहिवले, सुभाष दिवठे, अमित फुलबांधे, रेशीम परशुरामकर, सुरज मेंढे, रजनीकांत खंडारे, चंदन गायकवाड, रा.कॉ. तालुका महिलाध्यक्ष कल्पना जाधव, राजश्री मालेवार यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील दहेगाव येथे कायनाईट खाण आहे. या खाणीतून कायनाईट उत्खननाचे काम १९९० ते १९९१ पर्यंत सुरू होते. या उत्खननाच्या कामावर तालुक्यातील जवळपास तीन हजार नागरिक होते. मात्र काम बंद झाल्याने या तीन हजार नागरिकांच्या हातातील काम हिरावल्या गेले असल्याचीही माहिती दिली. केंद्र शासनाला जागे करण्याकरिता तसेच तालुक्यात हजारो बेरोजगार नागरिकांच्या हाताला काम मिळण्याकरिता येत्या २९ जुलै रोजी तालुक्यातील बारव्हा येथे होणाऱ्या जनआक्रोश चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पत्रपरिषदेतून केले आहे.
240721\img-20210724-wa0041.jpg
पञपरीषदेत ऊपस्थित तालुकाध्यक्ष बालु चुन्ने , शहर अध्यक्ष ॲड मोहन राऊत व ईतर पदाधिकारी कार्यकर्ते