शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

लोकगीतांच्या तालावर धान रोवणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:21 PM

शिवशंकर बावनकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :पावसाच्या सोबतीनंअंग भिजे जागोजागीकेवळा मोठा गुणवाणकोण बाई राबविले मनाकेवळा बोले हो केवळा बोले!असे सुमधूर लोकगीत कानाला ऐकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून ती शेतशिवारात सुरु असलेल्या रोवणी दरम्यान महिलांकडून गायली जात आहे. ही लोकगीत कानावर पडल्याने परिसरातील शेतात रोवणी सुरु असल्याचे ...

ठळक मुद्देसंततधार पावसाने शेतकरी सुखावला : रोवणीला जोमाने सुरुवात, मजुरीचे दर वधारले

शिवशंकर बावनकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :पावसाच्या सोबतीनंअंग भिजे जागोजागीकेवळा मोठा गुणवाणकोण बाई राबविले मनाकेवळा बोले हो केवळा बोले!असे सुमधूर लोकगीत कानाला ऐकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून ती शेतशिवारात सुरु असलेल्या रोवणी दरम्यान महिलांकडून गायली जात आहे. ही लोकगीत कानावर पडल्याने परिसरातील शेतात रोवणी सुरु असल्याचे लक्षात येते. तालुक्यात धान रोवणी धडाक्यात सुरु असून लोकगीतांनी शेतकऱ्यांचे शिवार गुंजू लागले आहे. या गीतांनी आसमंत दुमदुमू लागले आहे. प्रारंभीचे काही दिवस पावसाअभावी कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत असतानाच आता पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांमध्ये उत्साह आहे.मुबलक पावसामुळे अनेकांनी प्रत्यक्ष रोवणीच्या कामाला धडाक्यात सुरुवात केली आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात जास्तीत जास्त महिला मजुरांना रोवणीसाठी बोलावू लागले. पऱ्हे काढणाऱ्यांनी पऱ्हे काढले, चिखल केलेल्या बांधीत पेंढ्या पसरविल्या आहेत. डोक्यावर मोऱ्याचे वजन घेवून रोवणी करीत मागे जाणाऱ्या महिलाउठ उठ पाकुरा,जा माझ्या मायेराकेवळा मोठा गुणबाणकोण बाई राबविले मन्हाकेवळा बोले हो केवळा बोलेअसे लोकगीत गात भात रोवणी करीत आहेत. पुढे मालकीन व मागे मालक यांचा रोवणी लवकर उरकावा यासाठी तगादा सहन करीत केव्हा एकदा पात पडते. यांची प्रत्येक जण वाट पाहताना दिसत आहे. पात पडली की थोडी उसंत घेणे आणि पुन्हा नवीन पातीसाठी सज्ज होत आहेत. अशिक्षित महिलांनी चमक अनुप्रास यांचा योग्य वापर करून रचलेली सुरेख गाणी कानावर पडताच बहिणाबाई चौधरी यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. एका शेतकऱ्याच्या महिलांनी म्हटलेले हे गीतपावसाच्या सोबतीनअंग भिजे जागो जागीघरातील सुहास चंदनाचाशेतकरी धरणी मायेलेदान पिकाची घरीभरो धान्याच्या राशीसाकोली तालुक्यात ४० हजार ५० हेक्टर क्षेत्र लागवडी आली असून २४ हजार हेक्टर क्षेत्र धान लागवडीखाली आहे. पेरणीच्या कामांना जोमाने सुरुवात करण्यात आली. शालेय मुले मुली वार्षिक शैक्षणिक खर्च काढण्यासाठी शेतशिवारात कामावर जात आहेत. अस्सल लोकगीतांची खाण असलेल्या शेतशिवारात सर्वदूर मजूर कोकीळेचे सूर ऐकायला येतात. याच सामूहिक लोकगीतांची मैफील धान रोवणी करताना दिसून येते.गावाच्या पटलाचाशेतशिवारी रोवणाराखी बांधाया येईल बयनालागे पावसाचा हेवाहर बोला हर हर महादेवाअशा लोकगीतांनी शेतशिवार चैतन्याने न्हाऊन निघाले आहे. रोवणीच्या वेळी लोकगीत म्हणण्याची पद्धत पूर्वीच्या काळापासून रूजली आहे. अलीकडच्या धकाधकीच्या युगात पुरातन स्त्री शेतावर असे लोकगीत म्हणताना दिसत आहे. इतर मजुरांमध्ये शाळकरी मुली, शिक्षित स्त्री या सुद्धा शेतात रोवणीला जात असल्यामुळे त्यांच्या तोंडी पुरातन रोवणीच्या गीताऐवजी चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. लोकगीत काळानुरुप लुप्त होत चालली आहेत. अनेक काळापासून सुरु असलेल्या लोकगीताच्या संस्कृतीला नव्या पिढीने नाकारले आहे.पावसाने चांगली साथ देवून रोवणी आटोपल्यानंतर बळीराजाला आनंद होतो. रोवणी संपण्याच्या दिवशी चिखलाची पूजा करून तो प्रत्येकाला लावतात आणि अंगावर चिखल टाकला जातो. खांद्यावर नांगर घेवून चालणारी गडी माणसं आणि मागे गीत गाणाºया महिला यांच्या सोबत मालकीण घराकडे जाताना गाणे गात जातात.कोण्या पाटलाचा रोवणा सरला गंपाटलाचा रोवणा सरलावजा आणतो कोणाची राणीवजा आणते पाटलाची राणीअशी गाणी म्हणत सारे देवळापाशी येतात. देवळाला चिखल अर्पण करतात असे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.