शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

घोडायात्रेची जय्यत तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:18 PM

विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या घोडायात्रेची जय्यत तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. अड्याळ येथील जागृत हनुमंत देवस्थानात दरवर्षी चैत्रनवरात्री दिवसात भव्य दिव्य भक्तीमय सोहळा मोठ्या आनंदात पार पडतो.

ठळक मुद्देअड्याळ येथे उसळणार जनसागर : श्रीरामनवमी, हनुमान जयंती, सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा

विशाल रणदिवे ।आॅनलाईन लोकमतअड्याळ : विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या घोडायात्रेची जय्यत तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे.अड्याळ येथील जागृत हनुमंत देवस्थानात दरवर्षी चैत्रनवरात्री दिवसात भव्य दिव्य भक्तीमय सोहळा मोठ्या आनंदात पार पडतो. यात सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमासोबतच शैक्षणिक आणि समाजउपयोगी उपक्रम सुद्धा राबविले जातात.यावर्षी १८ मार्च ते ३१ मार्च या पंधरवाड्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी केले आहे. त्यात मनोकामना पूर्ती अखंड ज्योती कलश स्थापना, देवी भागवत कथा, अखंड ज्योती कलश यात्रा संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह, श्री रामजन्मोत्सव, हनुमंत जयंती उत्सव, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरलेली सर्वधर्म समभाव सामूहिक विवाह सोहळा व भव्य महाप्रसाद वितरण सोहळा या आनंदमयी भक्तीभाव वातावरणात, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व ग्रामस्वच्छता अभियान सुद्धा दरवर्षी येथील भागवत पंच कमेटी असे समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात.सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भेटवस्तू मिळणार असल्याचे भागवत पंच कमेटीने सांगितले आहे. यामुळे विवाह नोंदणी सुद्धा सुरु आहे. अखंड ज्योती मनोकामना पूर्ती ज्योती कलशाची मोठ्या उत्साहात नाव नोंदणी सुरु आहे. अड्याळ येथे स्वयंभू जागृत हनुमंत देवस्थानावर आजही भाविक भक्तांची भक्ती भाव दरदिवसाला याच मंदिरात पाहायला मिळते. यातील महत्वाचे म्हणजे नाथ जोगी समाज या पावन दिव्य देवस्थानाला आजही भेट देतात. मागील काळात एका भक्ताने आपलं जीव वाचलं म्हणून मंदिराच्या आवारात लाडू वाटप केले होते. त्याचे कारण म्हणजे श्रद्धा असे म्हणतात की जिथून विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरु होते. अशा बऱ्याच घडलेल्या घटना याच मंदिरात आल्यावर आनंदाश्रू नयनांनी आनंदाने भाविक भक्त मंडळी आजही सांगताना दिसतात. घोडायात्रेची चाहुल लागताच येथील लहान मंडळी पासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्येही एक वेगळाच उत्साह आनंद पाहायला मिळतो. भागवत समितीचे अध्यक्ष डॉ.भैय्यासाहेब क्षीरसागर तथा कार्यकारी अध्यक्ष म्हणून यावर्षी रामकृष्ण कुर्झेकर, उपाध्यक्ष भूषण लांबट, सचिव धनंजय मुलकलवार, कोषाध्यक्ष रिंकू सलूजा, सरपंच जयश्री कुंभलकर, उपसरपंच प्रकाश मानापुरे, प्रभू वंजारी, नितीन वरगंटीवार, शाम चौधरी, नीळकंठ ढवळे आणि समस्त अड्याळ ग्रामवासी यात्रेसाठी सज्ज आहे.