शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

तीन वर्षांपासून रखडलेला भेल प्रकल्प सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:51 AM

जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम तीन वषार्पासून पूर्णपणे बंद आहे. सौरउर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान न मिळाल्याने भेलच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद आहे. केंद्र सरकारने विदभार्तील पहिला सौर उर्जा प्रकल्प अनुदानअभावी रखडून ठेवला आहे. भेल प्रकल्पाला पर्यावरण संवर्धन येथून वगळण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा : शेतजमिनी संपादित करण्याचा उपयोग तरी काय?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम तीन वषार्पासून पूर्णपणे बंद आहे. सौरउर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान न मिळाल्याने भेलच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद आहे. केंद्र सरकारने विदभार्तील पहिला सौर उर्जा प्रकल्प अनुदानअभावी रखडून ठेवला आहे. भेल प्रकल्पाला पर्यावरण संवर्धन येथून वगळण्यात आले आहे. पर्यावरण विषयक सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. पाच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर ५०० कोटी खर्च झालेत. अनेक शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी शेतजमिनी दिले.भेल प्रकल्प सुरु झाला असता तर बेरोजगारांनाच्या हाताला काम मिळाले असते. जमिनीचे अधिग्रहण कार्यालये, सुरक्षा भिंत याचे काम झाले आहेत. विदभार्चा महत्त्वाकांक्षी भारतातील पहिला सौरउर्जा प्लेटप्रकल्प मेक इन महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित ठरत आहे. भेल प्रकल्प सुरु झाल्यास जिल्ह्यातील तंत्रशिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणांना रोजगार मिळेल.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विदभार्तील असताना सुद्धा भेल प्रकल्प थंडबस्त्यात आहे. क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकल्पाच्या कार्यालयात कुणीही अधिकारी राहत नाही. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत हा प्रकल्प रखडला आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील डेव्हलप प्रोजेक्टच्या प्रचार होत असताना जिल्ह्यातील भेल प्रकल्प बंद पडलेला आहे.तीन वषार्पासून रखडलेला भेल प्रकल्पाचा काम सुरु करावे. जेणेकरून भूमिहीन झालेल्या शेतकºयांच्या मुलांना रोजगार मिळेल तथा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असे निवेदन दिवाकर रावते, परिवहन व खारभुमी विकास मंत्री आणि ना. सुभाष देसाई, उद्योग व खनिकरण मंत्री यांच्या मार्फत केंद्रिय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना देण्यात आले.यावेळी निवेदन सादर करताना शिवसेना भंडारा जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, पंचायत समिती माजी उपसभापती व शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेखर कोतपल्लीवार, लवकुश निर्वाण, युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, युवासेना तालुका अधिकारी संजू डाहाके, माजी शहर प्रमुख ओमप्रकाश ठोंबरे, राजू निखाडे, युवराज दाखले, मनोज कपोते सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना