आंदोलन : खासदारांच्या कार्यालयासमोर रेलयात्री समितीची निदर्शनेभंडारा : भंडारा शहरात रेल्वे स्टेशन भंडारा ते भंडारा रोड शटल ट्रेन सुरु करावी, जलदगती गाडयांचे थांबे रेल्वे वेळापत्रकात भंडारा रोडचे नाव समाविष्ट करणे व विविध रेल्वे समस्यांकडे रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भंडारा येथील खासदार नाना पटोले यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भंडारा जिल्हा रेल यात्री सेवा समिती व जनआंदोलन कृती समितीतर्फे प्रेमराज मोहोकर यांच्या अध्यक्षतेखाली धरणे देण्यात आले.यावेळी समितीचे सचिव रमेश सुपारे, कृती समितीचे संयोजक हिवराज उके यांनी प्रामुख्याने भंडारा शहर रेल्वे स्थानकाबाबत व इतर समस्यांच्या बाबतीत विद्यमान खासदारांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी या समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष घालावे, तसेच रेल्वे मंत्रालयाकडे या मागण्यांचा पाठपुरावा करावा, असे मत व्यक्त केले. प्रा.वामन तुरिले, गोविंदराव चरडे, आस्तिक नंदागवळी यांनीही रेल्वेच्या संदर्भात भंडाऱ्यावर अन्याय होत असल्याचे विचार व्यक्त करून जनप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालण्याची मागणी केली.खासदार नाना पटोले यांनी पुढाकार घेऊन रेल्वे स्थानकावर आंदोलन करावे, जनता त्यांना साथ देईल अशी प्रतिक्रियाही वक्त्यांनी बोलावून दाखविली. प्रा.प्रेमराज मोहोकर यांनी वारंवार निवेदन देऊनही खासदार या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.नाना पटोले यांच्या वतीने स्वीय सचिव पियुष हलमारे यांनी मंडपात येवून निवेदन स्वीकारले. धरणे आंदोलनात समितीचे रामविलास सारडा, इंद्रजित आनंद, सुरेश फुलसुंगे, शहर सुधार समितीचे तुलाराम साकुरे, डॉ.आयलवार, एस.के. भादुडी, वरियलदास खानवानी, विष्णूपंत पंड्या, ललीत बाच्छील, प्रा.देवराम मेश्राम, माणिकराव कुकडकर, प्रियकला मेश्राम, झुलन नंदागवळी, पुष्पा तिघरे, पंकज गजभिये, मंगेश माटे, जितेंद्र व अन्य सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भंडारा शहरातून ‘शटल ट्रेन’ सुरू करा
By admin | Published: May 27, 2015 12:34 AM