अड्याळ : देशातील सामान्य नागरिकांना कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. ६० वर्षारील ज्येष्ठ नागरिक अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना प्राधान्याने कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण देणे आता अडयाल ग्रामीण रुग्णालयात सुद्धा ९ मार्च पासून सुरुवात झाली आहे यामुळे गावातील समस्त ज्येष्ठ तथा ४५ वर्षांहुन अधिक वयाच्या व्यक्तींनी रुग्णालयात येऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथील अधीक्षक डॉ थुल तथा समस्त आरोग्य कर्मचारी व आशा सेविका तथा ग्रामपंचायत अडयाळ यांनी केले आहे.
सोबत येतांना वयाचा पुरावा मिळावा म्हणून आधार कार्ड अनिवार्य राहणार आहे लाभार्थीना कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे यासाठी भ्रमनधवणी क्रमांक , तसेच ४५ पेक्षा जास्त वयोगट असणाऱ्यानी सोबतच आपण घेत असलेली व डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची चिठ्ठी सोबत असणे यावेळी गरजेचे राहणार असल्याची माहिती आहे अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या उपकेंद्र तथा आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले आहे
अडयाळ येथे ९ मार्च ला कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत ची वेळ राहणार असल्याचेही यावेळी माहिती दिली आहे. लसीकरण झालेल्याना काही त्रास होत असल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथे संपर्क साधावा अशीही माहिती यावेळी डॉ थुल यांनी दिली यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते सध्या गावात आशा वर्कर मार्फत घरोघरी माहिती पोहचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहे