शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

दुर्गाबाईडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ

By admin | Published: January 14, 2017 12:33 AM

साकोली तालुक्यातील कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाईडोह येथे आजपासून भव्य यात्रेला प्रारंभ होत असून प्रशासनाची पूर्व तयारी झालेली आहे.

दर्शनासाठी भाविक उत्सुक : पोलीस प्रशासन सज्ज, लाखोंची उलाढालकुंभली : साकोली तालुक्यातील कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाईडोह येथे आजपासून भव्य यात्रेला प्रारंभ होत असून प्रशासनाची पूर्व तयारी झालेली आहे. या यात्रेत अनेक श्रद्धास्थान भाविक दुर्गाबाई देवीचे व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने येतात. यामध्ये जिल्ह्यासह गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. श्रद्धेने डोहात स्रान करतात. पहाटेपासूनच पवित्र स्रानाला सुरूवात होते. गावात पाहुण्यांची रेलचेल असते.या यात्रेत कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन ुसज्ज आहे. तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची, आरोग्य सेवा आदी सेवा प्रशासनातर्फे भाविकांसाठी केल्या आहेत. मकरसंक्रांतीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा पाच दिवस भरते. या यात्रेत पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्याची दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. पूर्वीपासून ही यात्रा घोड्यांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु कालांतराने घोडाबाजार मंदावला. फक्त दोन ते चार घोड्यांचे दर्शन होते. या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रूपयांची उलाढाल होते. हॉटेल्स, कपड्यांची दुकाने, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, लोकरीची दुकाने, दगडी पाट्यांची दुकाने, प्रदर्शनी तसेच विशेष आकर्षण असलेले ब्रेक डान्स झुला व मौत का कुवा या सर्व प्रकारामुळे यात्रा फुलून जाते. यात्रेकरिता प्रवाशांची जाण्या-येण्याची पद्धतशीर सोय व्हावी म्हणून एस.टी. महामंडळातर्फे ज्यादा बसेसची व्यवस्था केलेली असते.या डोहावर निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला असून प्रकल्पाची सर्व दारे बंद करून पाणी अडविले असल्यामुळे डोहातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे डोहाच्या चारही बाजूला बॅरिगेटस तयार केले असून डोहाच्या बाजूने आंघोळीकरिता बंदी घालण्यात आली आहे. यात्रेत निसर्गाचा सुंदर नजराना पहावयास मिळत असतो. यात्रेचे भव्य स्वरूप बघता पोलीस प्रशासन बारिक नजर ठेवून आहे. जिकडे तिकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. भाविकांना शिस्तीने रांगेत दर्शन घेता यावे याकरिता पुरूषांकरिता व महिलांकरिता वेगवेगळी व्यवस्था केली आहे. अशाप्रकारे दुर्गाबाईचे मंदिर हे जागृत देवस्थान असून भाविक मोठ्या भक्तीभावाने येवून मकरसंक्रांतीच्या पर्वावर भरणाऱ्या यात्रेत दुर्गादेवीचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतात. चार ते पाच दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त गावात भजन, पुजन, नाटक व आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम होत असतात. सामाजिक ऐक्य, समरसता, निसर्गाचे सुंदर रूप यानिमित्ताने बघावयास मिळते. तसेच दुर्गाबाईच्या सात भावांनी बांधलेल्या परंतु अर्धवट राहिलेल्या खिंडीचे दर्शन सुद्धा होते. (वार्ताहर)एक दिवसीय जनप्रबोधन शिबिरसाकोली : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना शाखा साकोलीच्या संयुक्त विद्यमाने १४ जानेवारीला दुपारी ११.३० वाजता दुर्गाबाईचा डोह कुंभली यात्रेवर एक दिवशीय जनप्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे हस्ते तर अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक वसंत लाखे तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण आयुक्त मधुसूदन धारगावे भंडारा, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, गटशिक्षणाधिकारी पी.एस. टेंभुर्णे, उपसभापती लखन बर्वे, जिल्हा संघटक गोदिंया डॉ. प्रकाश धोटे, एस.एस. चव्हाण, जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा उपाध्यक्ष डी.जी. रंगारी भंडारा, रत्नाकर तिडके, मधुकर कुकडे, अशोक गायधने, राहुल डोंगरे तुमसर, महिला संघटिका प्रिया शहारे, किर्ती गणवीर, शिल्पा बन्सोड, ग्यानचंद जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन डी.जी. रंगारी, तालुका संघटक कागदराव रंगारी, यशवंत उपरीकर, बहेकार यांनी केलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)