मोहाडी : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने तीन वर्षांसाठी राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीत भिकारखेडा या छोट्या गावातील लोककलावंत पुरुषोत्तम बोंदरे यांची अशासकीय सदस्य पदावर निवड करण्यात आली.
ग्रामीण भागातील खडी गंमत, भारूड, गोंधळ, भजन, दंडार, नवटंकी नाटक आदी लोककला टिकून राहाव्यात . लोककलांची पुढील पिढींना माहिती व्हावी. एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन द्यावे, या हेतूने त्यांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी व प्रयोग अनुदानासाठी अनुदान दिला जातो. भांडवली खर्चासाठी प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी या कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे व त्यांची पात्रता तपासून निवड करण्यासाठी निवड समिती गठित करण्याची तरतूद आहे. त्यानुषंगाने समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. यात १२ सदस्य आहेत. या बारा सदस्यांत अशासकीय सदस्य म्हणून पुरुषोत्तम बोंदरे यांची नियुक्त करण्यात आल्याचे ८ सप्टेंबर रोजी राज्य शासनाचे उपसचिव विलास थोरात यांनी शासन निर्णय जारी केला आहे.
बॉक्स
पुरुषोत्तम बोंदरे यांनी वयाच्या २९ व्या वर्षापासून खडी गंमत या लोककलेतून प्रबोधन करायला सुरुवात केली. त्यांनी लोककलेतून अंधश्रद्धा निर्मूलन, समाजविषमता, स्त्री-पुरुष समानता, अशिक्षितपणा आदी विषयांवर प्रबोधन केले. आतापर्यंत भंडारा, गोंदिया व नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत व लगतच्या मध्यप्रदेश येथे ४०० च्यावर तमाशाचे प्रयोग केले आहेत. त्यांचे वडील भास्कर बोंदरे शिक्षक होते. त्यांना पोवाडे गायनाचा छंद होता. त्यामुळे पुरुषोत्तमवर वडिलांचा प्रभाव पडला. आपसूकच त्यांना वारसा प्राप्त झाला. जिल्हा ते राज्यस्तरावर झालेल्या लोककला मेळाव्यात पुरुषोत्तम बोंदरे यांनी खडी गमतीतून प्रभाव पाडला. आता ते भंडारा जिल्हा गंधर्व कलाकार समितीचे सचिव आहेत. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर वैद्यकीय पदविका घेऊन ते ग्रामीण भागात सेवा देत आहेत. त्यासोबतच खडी गंमतचे प्रयोग करीत असतात. कोरोना काळात त्यांनी युट्यूबवर कोरोना विषयावर जनजागृती केली. यांना राज्य शासनाच्या कलावंतांना अनुदान मंजूर करण्याच्या कमिटीवर नियुक्त केले गेले असल्याने भिखारखेडा येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
पथकाला मिळाले ५० हजार रुपये
भांडवली खर्चासाठी बोंदरे यांच्या कलापथक मंडळास २०१९ वर्षी ५० हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच प्रयोग पुरस्कार म्हणून १ लक्ष ४० हजार रुपये मिळणार आहेत.
कोट
ग्रामीण भागात लोककलावंतांची कला जिवंत ठेवण्यासाठी आपला प्रयत्न राहील. त्यांचा हक्क मिळवून दिला जाईल. शासनाची योजना तळातील कलावंतापर्यंत पोहोचवली जाईल. त्यांना आर्थिक सहाय मिळवून देणार आहे.
पुरुषोत्तम बोंदरे
सदस्य, महाराष्ट्र राज्य समिती, मुंबई
250921\img-20210924-wa0095~2.jpg
ग्रामीण भागातला लोककलावंत राज्य शासनाच्या समितीवर