आम्हाला सत्ता नको परंतु या आरक्षणासाठी विशेष अधिकार द्या. माझ्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मनगुट्टीवार यांच्यावर जबाबदारी द्या आम्ही तीन महिन्याच्या आत आरक्षण मिळवून देवून, असे संजय कुटे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आरक्षणावर कोणतीच भूमिका घेत नाही. काँग्रेस सभा निदर्शने घेवून केवळ आंदोलनाची भाषा करते. राष्ट्रवादीचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यात २६ जून रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. पत्रपरिषदेला खासदार सुनील मेंढे, माजी आमदार रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, चरण वाघमारे, ओबीसी राज्य सरचिटणीस संजय दाते, विदर्भ संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण, शिवराम गिरीपुंजे, राजेश बांते, चामेश्वर गहाणे, कोमल गभने आदी उपस्थित होते.
बॉक्स
आरक्षणासाठी सत्तेची लाचारी सोडा
ओबीसी समाज संतापला आहे. मात्र राजकीय आरक्षणाबाबत सत्तेतील कोणताच पक्ष भूमिका घेत नाही. उलट ओबीसीचे विषय गंभीर करून ठेवले आहे. सत्तेची लाचारी सोडा आणि आरक्षण मिळवून द्या, असे आवाहन संजय कुटे यांनी केले.