लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सुरक्षीत रस्ते असे ब्रीदवाक्य रस्ते मंत्रालयाचे आहे, परंतु खापा चौकातील राज्यमार्ग व राष्ट्रीय मार्गाला छेदणाऱ्या दोन्ही रस्ताशेजारी जड वाहनाचे पार्र्किंग झोन बनले आहे. सदर चौकात वाहतुक पोलिसांचे कायम दुर्लक्ष दिसत आहे. चोवीस तास वाहतुकीच्या रस्त्याकडे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी येथे कार्यरत आहेत हे विशेष.तुमसर-रामटेक - तुमसर- भंडारा राज्यमार्ग तथा रामटेक - गोंदिया राष्ट्रीय मार्ग खापा चौकातून जातो. राज्यमार्ग क्रमांक २४९ व २७१ करीत सदर चौक मुख्य स्थळ आहे. सदर मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. भंडारा- गोंदिया, रामटेक व नागपूर करीता येथून वाहने जातात. सदर दोन्ही रस्त्याच्या शेजारी दररोज रात्री सुमारे ६० ते ७० ट्रक उभे राहतात. यात टिप्पर १६ चाकी ट्रक कंटेनरचा त्यात समावेश आहे. रात्री त्याच्या पुढे-मागे सरकण्याचा काम सुरु राहतो. खापा चौकात पुर्वी पोलीस-चौकी होती. ती हटविण्यात आली. दोन्ही रस्त्याच्या प्रवेशद्वारावर येथे ट्रकांची मोठी रांग दिसते.ट्रक पार्र्किंगचे स्थळ म्हणून खापा चौकाची आता ओळख निर्माण झाली आहे. येथून मार्गक्रमण करतांनी जीव धोक्यात घालूनच मार्गक्रमण करावे लागते. याबाबत पोलीस प्रशासन मात्र मुग गिळून गप्प आहे. रस्ता शेजारीच ट्रक पार्किंग करण्याचा निश्चितच नियम नाही येथे नियमबाह्य पार्किंग करणाºया जड वाहनावर कारवाई का केली जात नाही हा संशोधनाचा विषय आहे. तुमसर पोलिसांनी येथे आतापर्यंत कारवाई केली नाही. आंतरराज्यीय कटंगी- वाराशिवनी मार्ग येथूनच जातो. काही महिने या चौकात पोलीस चौकी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निर्देशानुसार लावण्यात आली होती, परंतु ती नतर हटविण्यात आली. वर्दळीच्या चौकातून पोलीस चौकी हटविण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.जनावरांची वाहतूक करणारे मेटॅडोर व ट्रक याच मार्गाने रात्री जातात. मध्यप्रदेशातून ही जनावरांची खेप येते. कधी ती लेंडेझरी मार्गानेही नेली जाते. खापा चौकातून अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्गक्रमण करतात, पंरतु रस्ताशेजारी उभी ट्रक त्यांना दिसत नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य-राष्ट्रीय महामार्ग परिसर बनले पार्किंग झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:40 PM
सुरक्षीत रस्ते असे ब्रीदवाक्य रस्ते मंत्रालयाचे आहे, परंतु खापा चौकातील राज्यमार्ग व राष्ट्रीय मार्गाला छेदणाऱ्या दोन्ही रस्ताशेजारी जड वाहनाचे पार्र्किंग झोन बनले आहे. सदर चौकात वाहतुक पोलिसांचे कायम दुर्लक्ष दिसत आहे. चोवीस तास वाहतुकीच्या रस्त्याकडे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी येथे कार्यरत आहेत हे विशेष.
ठळक मुद्देखापा चौकातील प्रकार : वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह