लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील अत्यंत रहदारीचा समजला जाणाºया जिल्हा परिषद चौक ते खामतलाव चौकापर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्ता मोजणीच्या कार्यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून बांधकाम विभागाला पारदर्शकपणे काम करण्यासंदर्भात निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहे.उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता विस्तारीकरणानंतर भंडाºयात प्रथमच तीन कि.मी. पेक्षा जास्त लांबीच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम होणार आहे. यात जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक, राजीव गांधी चौक ते खामतलाव चौक व तिथून रामटेक मार्गापर्यंतच्या रस्ता विस्तारीकरणाचे काम प्रयोजित आहे. त्यासंदर्भाने जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक मार्गाकडे जाणाºया रस्त्याची मोजणी संबंधित विभागाकडून सुरु आहे. यात रस्त्याच्या मधातून मोजमाप न करता राजीव गांधी चौकाकडे जाणाºया उजव्या बाजूला अधिक जागा तर डाव्या बाजूला कमी मोजमाप ग्राह्य धरण्यात येत असल्याचा आरोपही या मार्गावरील रहिवासी असलेल्या नागरिकांनी केले आहे.मोजमापामध्ये होत असलेल्या त्रृटीसंदर्भात रस्त्याच्या मधातून दोन्ही बाजूला १२ मिटर म्हणजेच ४० फुटापर्यंत मोजमाप करायचे आहे. परंतु प्रत्यक्षात एका बाजूला कमी तर एका बाजूला जास्त असे मोजमाप करण्यात येत आहे. सदर कामाची फेरमोजणी नियमाप्रमाणे वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरखीत करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर रस्त्याचे विस्तारीकरण नियमांतर्गत झाल्यास नागरिकांना त्याचा लाभच होणार आहे. या मार्गावर अतिक्रमणाची समस्या आ वासून उभी आहे.
राज्य मार्ग मोजणीत भेदभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:26 AM
शहरातील अत्यंत रहदारीचा समजला जाणाºया जिल्हा परिषद चौक ते खामतलाव चौकापर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु होणार आहे.
ठळक मुद्देतर होणार रस्ता मोठा : नागरिकांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन