भंडारा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा भंडारा, युवा आघाडी , महिला आघाडी व सेवा आघाडीच्या वतीने
ओबीसींच्या आरक्षणाबाबत निवेदन देण्यात आले. सदर निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रशेखर गिरडे, सचिव अभिजित वंजारी, उपाध्यक्ष पवन मस्के, पुरुषोत्तम कांबळे, प्रमोद मानापुरे, सेवा आघाडी नागपूर विभाग अध्यक्ष जाधवराव साठवणे, प्रांतिक जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना दंडारे, सेवा आघाडी तालुका अध्यक्ष इंद्रजित कुरझेकर, युवा आघाडी तालुका अध्यक्ष प्रवीण भोंदे, महिला आघाडी शहर अध्यक्ष शरयू देशमुख, युवा आघाडी शहर अध्यक्ष नरेंद्र साकुरे, सेवा आघाडी शहर अध्यक्ष तुळशीराम तिघरे, जिल्हा संघटक भाऊराव देशमुख यांच्या उपस्थित ओबीसींच्या आरक्षणाबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. निवेदन देण्यासाठी धनराज राखे, संदीप धुर्वे, रोशन बावनकुळे, अनिल कांबळे, भाऊराव वंजारी, माधुरी साठवणे, श्वेता ठाकरे, योगिता धांडे, मथुरा मदनकर व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा भंडारा, युवा आघाडी , महिला आघाडी, युवा, सेवा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.