लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गत १५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय बेमुदत आंदोलनाला सोमवारपासून सुरूवात केली असून शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघ भंडारा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निषेध करण्यात आला.आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मात्र शासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याने राज्यभरात कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.तीन टप्यात आंदोलनाला सुरूवात झाली असून शासनाने वेळीच आंदोलनाची दखल न घेतल्यास आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास कर्मचारी जबाबदारी राहणार नाहित असा इशारा संघटनेने दिला आहे.शासन आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची महाभरती करणार असून या भरतीत कंत्राटी पदावर १० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही परीक्षा न घेता कायमस्वरूपी शासनसेवेत सामावून घेवून मानधनात वाढ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनाला आरोग्यसेवक समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली राऊत, उपाध्यक्ष सुष्मा बांगडकर, नफिसा सैय्यद, भारती भांडारकर, स्मिता फुले, वैशाली राऊत, पल्लवी बावनकर, सुप्रिया मोटघरे, वर्षा बांते, कविता बारसागडे, सीमा वासनिक, संगिता आकरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.यासंदर्भात संघटनेतर्फे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्याधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेवून न्याय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.गत १५ वर्षांपासून रुग्णांना सेवा देत आहोत. मात्र शासनाकडून दुजाभाव होत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी संघटनेतर्फे आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाची शासनाने योग्य वेळीच दखल घ्यावी.-वर्षा रामटेके, जिल्हाध्यक्ष कर्मचारी महासंघ, भंडारा.शासनाकडून नवनियुक्त कर्मचाऱ्यांना तसेच स्थायी कर्मचाऱ्यांना अधिक वेतन दिले जाते. मात्र तेच काम कंत्राटी कर्मचारी अल्प मानधनावर करीत आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करुन न्याय द्यावा.-वैशाली राऊत, महिला कर्मचारी, भंडारा.
‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 5:00 AM
आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मात्र शासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याने राज्यभरात कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, शासनसेवेत कायम करण्याची मागणी