जांब (लोहारा): तुमसर तालुक्यातील लोहारा येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच प्रकाश दुपारे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास आणला होता. हा अविश्वास ग्रामपंचायतच्या मासिक सभेत बहुमतांनी पारीत केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभेतून पदावरून पायउतार करण्याचे आदेश दिले. तुमसर तहसीलदार तुमसर टेळे यांनी लोहारा येथे विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले. यामध्ये १३४८ मतदारांपैकी ४०४ मतदारांनी नोंदणी केली. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. ग्रामसभेमध्ये उपस्थित ४०४ मतदारांच्या नोंदणीपैकी ३८३ मतदारांनी मतदान केले. २१ मतदारांनी मतदान केले नाही. त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने २१६ मते मिळाली तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध १४९ मते मिळाली व १८ मते अवैध ठरली. विशेष ग्रामसभेमध्ये अविश्वास ठराव संमत झाला. त्यामुळे उपसरपंच प्रकाश दुपारे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला, असे गटविकास अधिकारी तुससर यांनी ग्रामपंचायत सचिवांना पत्राद्वारे कळविले आहे.
लोहारा येथील उपसरपंचपदावरून पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:36 AM