लाखांदूर : तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी लाखांदुर :
देशात सर्वत्रच कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात असतांनाच लाखांदुर येथील कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधेने रुग्णांना रेफर टु भंडारा केले जात असतांनाची बाब अशोभणीय असुन तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये सर्व सुविधा तात्काळ ऊपलब्ध करा व ररुग्णांना रेफर टु भंडारा थांबवा अशी मागणी लाखांदुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने केली आहे.
सदरच्या मागणीचे निवेदन लाखांदुर तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना २० एप्रिल रोजी पाठविण्यात आले.
प्राप्त निवेदनानुसार, सध्या जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत आहेत. लाखांदुर तालुक्यातही या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असुन त्यांना गृ़ह विलगीकरणात ठेवण्यात येत असल्याची माहिती होती. त्यानुसार तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने ४ एप्रिल रोजी केलेल्या मागणीने ९ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय मुलींच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले.
सध्या घडीला तालुक्यातील सर्वच गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत असुन येथील ७ गावे प्रतिबंधीत केले आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांना लाखांदुर येथील कोविड केअर सेंटर मध्ये ठेवलेवल जात आहे मात्र सदरच्या कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा असल्याने रुग्णांना रेफर टु भंडारा केले जात असल्याची सर्वत्रच ओरड आहे.
लाखांदुर ते भंडारा हे अंतर जवळपास दोन तासाचे असुन यात रुग्णाला भंडारा येथे घेऊन जात असतांना अनेकजन दगावल्याचीही माहिती आहे. त्यामुळे लाखांदुर येथील कोविड केअर सेंटर मध्ये व्हेंटीलेटर , ऑक्सिजन, रेमेडीेसीविर, एक्स रे मशीन , सिटी स्कॅन मशीन व कोविड ऊपयुक्त सर्व सुविधा ऊपलब्ध करण्याची मागणी निवेदनातुन केली आहे.
सदर मागणीचे निवेदन लाखांदुरचे नायब तहसिलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देतेवेळी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बालु चुन्ने, राका शहर अध्यक्ष ॲड मोहन राऊत, सुभाष दिवठे, मंगेश ब्राम्हणकर, सचिन बरये, संजय नहाले, सचिन मेंढे, सुनिल मेंढे यांसह अन्य पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.