भंडारा : शेतकऱ्यांची धान केंद्रावरील होत असलेली लुबाडणूक ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव मनोज बागडे यांनी केलेली आहे.जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ज्या ज्या शेतकऱ्याकडे त्यांची ओलीताची सोय आहे अशा ठिकाणी बडीराजाने मोठ्या कष्टाने उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले. परंतू शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. शेतकऱ्यांनी धानाची कापनी करून मळनी मार्च ते एप्रिल महिन्यात केलेली आहे परंतु शासनानी हे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ एप्रिलपासून सुरू करण्यात यावे, असे आदेश आहेत. जेव्हा की एकाही तालुक्यात १५ एप्रिलला धान केंद्र सुरू केले नाही हे सर्व धान खरेदी केंद्र २० एप्रिलनंतर सुरू केलेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी वाट बघता बघता त्रासून गेलेत व त्यामुळे ५० टक्के शेतकऱ्यांनी आपले धान कवडीमोलांनी म्हणजे १,२०० रूपये प्रती क्विंटल विकावे लागते.शासनानी जे केंद्र सुरू केलेत त्यातही मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. प्रत्येक केंद्रावर दिवसभरातून ३०० ते ४०० कट्ट्याच्यावर मोजमाप होत नाही. हे ईलेक्ट्रॉनिक वजनाद्वारे असते तर ते लवकर झाले असते व शेतकऱ्याचे नुकसान झाले नसते. प्रती कट्टा ४० किलोचा असून त्यामागे शेतकऱ्याकडून प्रती कट्टा ५ रूपये हमाली वेगळी घेतली जाते. शासनानी प्रती क्विंटल १,६१० रूपये देण्याचे ठरले असून त्यात १,४०० रूपये पहिल्यांदा देण्यात येतील व यावरील बोनस २१० रूपेय नंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक शेतकरी उन्हाळी धान पिक प्रती एकरामागे २५ ते ३० क्विंटल धान पिकवित असतो. परंतु शासनानी शेतकऱ्यांना त्याचे धान प्रती एकरी १२ क्विंटलच धान खरेदी करीत आहे. (नगर प्रतिनिधी)
धान खरेदी केंद्रांतील लुबाडणूक थांबवा
By admin | Published: May 27, 2016 12:54 AM