लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या तीन मॅग्नीज खाणी लाभलेला तुमसर रोड रेल्वे स्थानक आहे. यातिन्ही मॅग्नीज खाणीपासून रेल्वे प्रशासनाने करोडो अरबो आतापर्यंत कमाविले व कमिवित आहेत.मात्र स्थानकाची चुकीची श्रेणी दर्शवून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्न प्रशासनाने थांबवून स्थानक विकसित करण्याच्या हेतूने हावडा-शिर्डी, पुरी-अजमेर, पुरी जोधपूर या सुपरफास्ट गाड्यांचा थांबा तुमसर रोड येथे द्यावा अशा आशयाचे मागणीचे निवेदन मानव विकास पथचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र धोटे यांनी रेल महाप्रबंधक एस.एस. सोईन यांना दिले आहे. धोटे यांनी दिलेल्या निवेदनात स्थानकात रॅम्पपुल नसल्यामुळे दिव्यांग, जेष्ठ नागरिक तसेच महिला व बालकांना यातना सहन कराव्या लागत असून तातडीने रॅम्प वनविण्याची मागणी केली. त्याच बरोबर भंडारा रोड ते जवाहरनगर जाणारी अनफिट रेल्वे लाईनची दुरूस्ती करावी. तिरोडी ते अजनीपर्यंत जाणारी दुपारची गाडी सुरू करावी. रामटेक-तुमसर वरून कतिरा प्रस्ताव दिले गेले होते. त्यावर सर्वे होऊन मंजुरी मिळाली. मात्र अजुनपर्यंत भूमिअधिग्रहन अजूनपर्यंत झाले नाही. त्याची पूर्तता करावी तुमसर टाऊन रेल्वे स्टेशनवर शौचालय, शेड आधिचा अभाव आहे. यापुर्वी टाऊनवर पिट लाईन, रॅक पॉईन्ट, गोदाम होता तो परत सुरू करण्यात यावा आदी मागण्या संबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी धोटे यांच्यासह गुलराज कुंदवानी, रामदास श्रीचंदानी, भुपेंद्र तलमले, गजानन धोनमोडे, सदानंद बडवाईक, मोहन मलेवार, धनराज गभने व अन्य सहकारी उपस्थित होते.
सुपरफास्ट गाड्यांचा थांबा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:24 AM
आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या तीन मॅग्नीज खाणी लाभलेला तुमसर रोड रेल्वे स्थानक आहे. यातिन्ही मॅग्नीज खाणीपासून रेल्वे प्रशासनाने करोडो अरबो आतापर्यंत कमाविले व कमिवित आहेत.
ठळक मुद्देमागणी : रमेशचंद्र धोटे यांचे रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन