शाब्दिक चकमक : पोलिसात परस्पर विरोधात तक्रारतुमसर : संजय गांधी योजना समितीच्या सभेत समिती सदस्यांनी कर्मचाऱ्यांना असभ्य भाषा वापरुन मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करुन तुमसर पोलीस ठाण्यात समिती सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.सोमवारी तुमसर तहसील कार्यालयात संजय गांधी योजना समितीची सभा होती. या सभेत शासकीय कर्मचारी सुनिल लोहारे यांना समिती सदस्य लालू हिसारीया यांनी असभ्य भाषा वापरुन अंगावर धावून आले. घडलेल्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचानिषेध नोंदवून कामबंद आंदोलन पुकारले.यापूर्वी ४ जानेवारीला संजय गांधी योजना समिती सभेत कर्मचारी अल्का मेश्राम यांना देखील समिती अध्यक्षांनी अश्लिल शिविगाळ केली होती. तहसील कार्यालयातील कर्मचारी कामासाठी आलेल्या नागरिकांची दिशाभूल करतात असा आरोप करुन त्यांना वठणीवर आणण्याची तंबी दिली. यासंदर्भात वरिष्ठांना सांगितले असता त्यांनीही दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीत काम करणे अशक्य झाले आहे. कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाली आहे. दडपणाखाली येथे राहावे लागत आहे. समिती सदस्य आपल्यासोबत देवगडे, गायधने, ठाकूर व इतर सदस्य नसतांनी सोबत घेवून येतात ते सुध्दा कर्मचाऱ्यांना असभ्य बोलीत असतात. समितीच्या सभेत ढवळाढवळ करुन गोंधळ घालतात.समितीचे अध्यक्ष व सदस्य आपल्या नावाने लेटरपॅड छापतात व त्याचे देयके कार्यालयीन खर्चातून काढण्यात वारंवार अधिकाऱ्यांवर दडपण आणतात. व अधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपण आणतात. ४ जानेवारीची समितीची सभा गोंधळ घालून स्थगित केली. पुढील सभा १६ जानेवारी ला घेण्याचे ठरविले होते परंतु त्या कालावधीत आचारसंहिता लागू झाल्याने १३ जानेवारी रोजी सर्व समिती सदस्यांनी आचारसंहिता लागू असल्याने सभा रद्द करुन देखील सभा १६ जानेवारी रोजी जाणीवपूर्वक करवून घेतली. समितीचे काही सदस्य सुट्टीच्या दिवशी येऊन संजय गांधी शाखेतील प्रकरणाला हात लावतात अशा स्थितीत त्यांनी अपात्र प्रकरणे पात्र केले तर त्यास कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.प्रकरणे तुम्ही गहाळ केल्या व त्या आम्ही आपलेकडील माणसे लावून शोधून काढू असे समिती अध्यक्ष मुन्ना पुंडे कर्मचाऱ्यांवर आक्षेप घेतात. संजय गांधी समिती गठीत झाल्यापासून समिती अध्यक्ष व सर्व समिती सदस्य कार्यालयीन कामकाजात वारंवार नाहक ढवळाढवळ करीत आहेत. त्यामुळे ही समिती बरखास्त करुन नविन समिती गठीत करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, भंडारा, उपविभागीय अधिकारी तुमसर तहसीलदार तुमसर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल लोहाटे, आर.डी. चव्हाण, इंदू कुथे, माधुरी मस्के, एस.व्ही. कुल्लरकर, माधव उके, ए.एस. नंदेश्वर, प्र.घ. गजभिये, अल्का मेश्राम, एस.आर. मस्के, के.एम. मेश्राम, जी.जे. नान्हे, राजू कांबळे, पंकज गवळी, सुनिल लोहाटे, अरविंद मोहनकर, आर.जी. सुर्यवंशी, एम.डी. कोडवते, एस.यु. बारस्कर, एस.टी. चौरागडे, पदमश्री गजभिये, टी.एम. पाटील यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका/शहर प्रतिनिधी) समितीच्या सभेत सुनिल लोहाटे या कर्मचाऱ्यांने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपमान करुन समिती सदस्यांशी दुर्व्यवहार केला. या प्रकरणाची तुमसर पोलीसात दुपारी ४ वाजता कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच तक्रार दिली. लोकांची कामे तात्काळ झाली पाहिजे याकरिताच आमची समिती आहे, आरोप निधार आहे. - लालू हिसारीया, संगायो समिती सदस्य तुमसरसमिच्या सभेत लाभार्थ्यांना किती पैसा वाटप झाला याची सविस्तर माहिती मागून आराखडा सादर करण्याच्या सूचना केली. इतर कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रकारच येत नाही. समितीला केवळ तहसीलदार जबाबदार आहेत. सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे आहे.समिती सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे कर्मचारी देण्यास असमर्थ ठरले. अर्थाचा अनर्थ चुकीने झाला. आठ दिवसापूर्वी माहिती विचारली ती माहिती गोळा करुन देणे हे कर्मचाऱ्यांचे काम आहे. - हरिचंद्र मडावी, समिती प्रमुख तथा नायब तहसीलदार तुमसर
तुमसरात महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By admin | Published: January 17, 2017 12:18 AM