लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शासनाद्वारे बालकांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न व उपाय केले जात आहेत. या उपायांना आणखी बळ देता यावे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक कार्यक्षम व्हावी, बालकांची गुणवत्ता वाढावी या हेतूने जिल्हा मुख्याध्यापक संघाने पुढाकार घेवून संकल्पना मांडली. या संकल्पनेला कृतीत उतरविण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी लगेच होकार दर्शविला. स्ट्राँगर हेडमास्टर, स्ट्राँगर स्कूल असा या नवोपक्रमाचा ब्रीद राहणार आहे.विविध विषयावर चर्चा करण्यासाठी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दालनात सभा घेण्यात आली. या सभेत बालकांच्या गुणवत्तेसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाने संकल्पना मांडली. खाजगी शाळातील बालक अधिक क्रियाशिल व्हावे म्हणून मुख्याध्यापक संघाने पुढाकार घेतला. संकल्पनेला शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर यांनी लगेच माझ्या मनातील कल्पनेला मुख्याध्यापकांनीच साद दिली, अशी प्रतिक्रिया दिली.शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर यांनी या उपक्रमाला स्ट्राँगर हेडमास्टर, स्ट्रांगर स्कूल असे नाव सुचविले. या उपक्रमासंबंधीत एप्रिल महिन्यात सभा घेण्यात येईल. शिक्षकांची कार्यशाळा घेतली जाईल. गटागटात चर्चा करण्यात येणार आहे. कार्यशाळेत उपक्रमांची आखणी व दिशा ठरविली जाईल, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर यांनी सभेत सांगितले.सभेला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव जी.एन. टिचकुले, उपाध्यक्ष राजू बांते, गोपाल बुरडे, कुंदा गोडबोले, ए.एस. देशपांडे, एस.एस. घोल्लर, ए.ए. रामटेके, व्ही.वाय. कारेमोरे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रकरण, अनुकंपा भरती, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती, ईबीसी देयके, सुट्यांचे परिपत्रक, नियमित वेतन, शाळा व मंडळ मान्यता विषयी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत विषयाबाबत शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मकता दाखविली. झिरो पेन्डसी कार्यालयाकडून काम होत असल्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनमुख्याध्यापकांना निवडणूक कामातून वगळण्यात यावे याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना मुख्याध्यापक संघाकडून निवेदन निवासी जिल्हाधिकारी भाकरे यांच्याद्वारे देण्यात आले.मुख्याध्यापकांच्या वेतन निश्चितीवर संस्था चालक अध्यक्ष, सचिवाची स्वाक्षरी अनिवार्य आहे. मुख्याध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीवर संस्था सचिव, अध्यक्षाची सही नसेल तर शिक्षक कर्मचाºयांही वेतन निश्चिती थांबविल्या जातील, असे लेखाधिकारी यांनी मुख्याध्यापक संघाला सांगितले.
गुणवत्तेसाठी स्ट्राँगर स्कूल उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 9:29 PM
शासनाद्वारे बालकांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न व उपाय केले जात आहेत. या उपायांना आणखी बळ देता यावे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक कार्यक्षम व्हावी, बालकांची गुणवत्ता वाढावी या हेतूने जिल्हा मुख्याध्यापक संघाने पुढाकार घेवून संकल्पना मांडली. या संकल्पनेला कृतीत उतरविण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी लगेच होकार दर्शविला. स्ट्राँगर हेडमास्टर, स्ट्राँगर स्कूल असा या नवोपक्रमाचा ब्रीद राहणार आहे.
ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाची संकल्पना : एप्रिल महिन्यात होणार कार्यशाळा