शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

महामार्गावरील कार्यालयात रस्तेच बनले पार्र्किं ग झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:17 AM

बेशुमार रहदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्र्किं ग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

नियोजनाचे धिंडवडे : वाहतूक शाखेचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बेशुमार रहदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्र्किं ग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तहसिल तथा पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची ही वाहने असून तहसिल कार्यालयात पेड पार्किंगमुळे ही समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. त्रिमुर्ती चौक परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय व पेट्रोलपंप आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ही सर्व कार्यालय एकमेकांसमोर वसली असल्याने रहदारीत अजून वाढ झाली आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात एका खाजगी इसमाला पेड पार्र्किंग करण्याचा कंत्राट दिले आहे. संबंधित कंत्राटदाराकडून दूचाकी वाहन चालकांकडून दिवसाकाठी दहा रुपये तर चारचाकी वाहन चालकांकडून ४० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या संदर्भात सदर कंत्राटदाराशी विचारणा केली असता, ‘एसडीएम साहेबांनी याबाबत परवानगी दिली आहे. शुल्क वसुल करण्याबाबत सक्ती करु शकत नाही’, असे सांगितले. अपघाताची शक्यतातहसील कार्यालय परिसर प्रशस्त आहे. लहान मोठ्या कामांसाठी अनेक लाभार्थ्यांसह विद्यार्थी व पालक येथे येत असतात. तहसील कार्यालयाच्या महामार्गाला लागून असलेले मुख्य प्रवेशद्वार तुटलेल्या स्थितीत आहेत. अश्या स्थितीत अर्जनविस बसत असलेल्या ठिकाणाहून ते कार्यालय परिसरात वाहन पार्किंग करायचे असेल तर शुल्क द्यावे लागते. मात्र शुल्क न देणारे वाहन चालक सदर वाहने महामार्गावरच पार्र्किंग करीत असतात. आधीच महामार्गाचे विस्तारीकरण झालेले नाही. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे वाहतूक शाखेने किंवा तहसील कार्यालय प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे.