शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भीमशक्ती संघटनेला बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:33 PM

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रामाणिक, निष्ठावान व स्वाभीमानी अनुयायांनी आपसातील हेवेदावे विसरुन भीमशक्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रीत येऊन ....

ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे : सानगडी येथे संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा

आॅनलाईन लोकमतसाकोली : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रामाणिक, निष्ठावान व स्वाभीमानी अनुयायांनी आपसातील हेवेदावे विसरुन भीमशक्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रीत येऊन खांद्याला खांदा लावून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय समस्या सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करावा. सर्वांचे प्रेरणास्त्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी वंचिताना नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार व न्याय प्रदान करण्यासाठी भीमशक्ती संघटनेला बळकट करण्यास सर्वांनी सहकार्य कराव,े असे आवाहन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.सानगडी येथील भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. यशवंत मेश्राम, बाबा बन्सोड, राजेंद्र देशभ्रतार, नामदेव पिंपळे, वामन कांबळे, रामचंद्र हुमणे, दादा टेंभुर्णे, प्रा. शेन्डे, मंगेश मेश्राम, कमलेश ऊके, महेश कोचे, हरिदास बोरकर, रविंद्र सोनपिंपळे, हरिचंद्र गेडाम, अंबादास नामदेवे, अजय भुतांगे, पतिराम चव्हाण, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.चंद्रकांत हंडोरे म्हणाले, विद्यमान सरकार हे शेतकरी, शेतमजूर, भूमीहिन, कामगार, सुशिक्षीत बेरोजगार शोषित, पिडीत, गोरगरीब नागरिकांच्या विरोधात आहे. या सरकारने आतापर्यंत बहुजन समाजाच्या हितांचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नाही. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. सबका साथ सबका विकासाच्या नावाखाली सर्वांना वेठीस धरुन बहुजन समाजाचे संविधान दत्त हक्क नाकारुन त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. जातीयवाद वाढवून सामाजिक तेढ निर्माण करुन अराजकता माजविल्या प्रयत्न केला जात असून नागरिकांच्या विश्वासघात केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाच्या विचारवंत नागरिकांनी सम्यक विचार करुन विद्यमान सरकारला जाब विचारुन यापुढे चांगला धडा शिकविण्यास समाजजागृती करावी, असे आवाहन केले. चंद्रकांत हंडोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भीमशक्ती संघटना ही शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार, भूमिहिन, गोरगरीब शोषित पिडीत नागरिकांच्या संविधानदत्त हक्क अधिकार न्यायासाठी लढणारी एकमेव संघटना आहे. युवकांनी भीम शक्ती संघटनेत सहभागी होऊन एकजुटीने कार्य करावे, असे प्रतिपादन अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी केले.पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत हंडोरे यांच्यावर विश्वास ठेवून भीमशक्ती चळवळ गतीमान करण्यासाठी जीवाचे रान करतील, अशी ग्वाही भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली. कार्यक्रमासाठी अनिल दहिवले, बाळकृष्ण शेन्डे, दामोधर ऊके, मोरेश्वर लेढारे, हितेंद्र मेश्राम व सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.