लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेती व्यवसाय ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ ठरत असून रेती माफियांसह महसूल आणि पोलीस कर्मचारी यात मालामाल होत आहेत. वाढत्या स्पर्धेत आणि हप्तेखोरीच्या प्रकारात जिल्ह्यात रेती तस्कारांकडून हल्ल्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. मात्र कारवाई करताना आक्रमक रेती तस्करांपुढे महसूल आणि पोलीस प्रशासन हतबल दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रातील रेती विदर्भासह मध्य प्रदेशात प्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रेतीघाटाचे लिलाव करून रेतीचा उपसा करणे अपेक्षित असते. दरवर्षी प्रशासनाच्यावतीने रेतीघाटांचे लिलाव केले जातात. मात्र काही रेतीघाट विविध कारणांनी लिलावात निघत नाही. असे रेतीघाट रेती तस्कारांसाठी कुरण ठरत आहे. जिल्ह्यात अधिकृत ६२ रेतीघाट आहेत. या रेतीघाटावरूनही रेतीची खुलेआम चोरी केली जाते. गत काही वर्षांपासून हा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. राजकीय आश्रयाने फोफावलेल्या या व्यवसायात अनेक जण उतरले आहेत. अगदी काही दिवसातच आर्थिक स्थिती सुदरत असल्याने अनेकजण या व्यवसायाकडे वळले आहेत. ट्रक, टिप्पर आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जाते. नदीपात्रात जेसीबीच्या मदतीने उत्खनन करून विना रॉयल्टी वाहतूक केली जाते.अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकांची निर्मिती केली आहे. मात्र बहुतांश पथक रेती तस्करांच्या दावणीला बांधल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना कारवाईचा कोणताही अधिकार नसताना थेट कारवाई केली जाते. आपल्या कमाईतील वाटा महसूल आणि पोलिसांना द्यावा लागत असल्याने अनेकदा रेती तस्कर आक्रमक होतात. त्यातून हल्ल्याच्या घटना घडतात.दोन दिवसांपूर्वी रोहा रेतीघाटावर तलाठी आणि कोतवालावर रेती वाहतुकदारांच्या भानगडीतून गावकऱ्यांनी हल्ला केला. वीज पुरवठा खंडित झाल्याने संतप्त झालेल्या गावकºयांनी तलाठी व कोतलवालाला मारहाण केली. यापुर्वीही रेती तस्करांनी अनेकदा आक्रमक होत हल्ल्याच्या घटना घडवून आणल्या आहेत. दीड वर्षापुर्वी पोलीस पथकावर थेट हल्ला करण्यात आला होता. त्यात एक पोलीस उपनिरीक्षक गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर तलाठी व इतर कर्मचाºयांवर हल्ल्याच्या घटना घडत असताना तुमसर तहसीलदारांच्या अंगावर हातोडा घेवून धावून जाण्याची घटना तुमसर तालुक्यातील चिचोली येथे घडली होती. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे नोंदवून अटकही करण्यात आली. रेती तस्कर महसूलच्या पथकावर वारंवार हल्ला करण्यामागचे कारण रेती चोरी अडथळा असले तरी मुख्य कारण हप्तेखोरी असल्याचे बोलले जात आहे. वेळेवर हप्ते पोहचूनही वरिष्ठांच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी रेती वाहतुकदारांवर कारवाई केली जाते. त्यामुळे संतप्त होवून हल्ल्याच्या घटना घडतात. दोन दिवसापुर्वी वैनगंगा वाळू वाहतूकदार संघटनेने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी रेती तस्करीतील हप्तेखोरीचा पर्दाफाश केला आहे. दरमहा ६० ते ७० हजार रूपये हप्तेखोरी जात असल्याने आम्ही कमाई तरी कशी करावी, असा प्रश्न रेतीवाहतुकदार करीत आहे. हा सर्व प्र्रकार वरिष्ठांना माहित असला तरी राजकीय आश्रयातून आणि हितसंबंधातून कारवाई होत नाही. यामुळे रेती वाहतूक प्रकरणात हल्ल्याच्या घटना वाढत आहे.गावकरी नाहक अडकलेरेती तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठी व कोतवालावर गावकºयांनी हल्ला करण्याची घटना गुरूवारच्या रात्री मोहाडी तालुक्यातील रोहा येथे घडली होती. रेती तस्कर आणि महसूल पथकात वाद झाला. यात हायड्रॉलिक ट्रॉलीने वीज पुरवठा खंडित झाला. गावकरी संतप्त झाले. त्यांनी बैठ्या पथकातील कर्मचाºयांवर हल्ला केला. महसूल आणि रेती तस्करांच्या वादात एका घटनेने गावकºयांवर गुन्हे दाखल झाले. आठ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र या सर्व प्रकाराचे मूळ कारण असलेले रेतीतस्कर मात्र वेगळे आहेत.
आक्रमक रेतीतस्करांपुढे हितसंबंधाने ‘महसूल’ हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 6:00 AM
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रातील रेती विदर्भासह मध्य प्रदेशात प्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रेतीघाटाचे लिलाव करून रेतीचा उपसा करणे अपेक्षित असते. दरवर्षी प्रशासनाच्यावतीने रेतीघाटांचे लिलाव केले जातात. मात्र काही रेतीघाट विविध कारणांनी लिलावात निघत नाही. असे रेतीघाट रेती तस्कारांसाठी कुरण ठरत आहे.
ठळक मुद्देहल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ : जिल्ह्यातील रेतीघाटांवरून बेसुमार रेतीचा अवैध उपसा खुलेआम सुरू