तुमसर: ग्रामीण रस्ते विकासाचे सशक्त माध्यम असून गावांना मुख्य रस्ते जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार राजू कारेमोरे यांनी गर्रा बघेडा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य सुरेश रहांगडाले, अनिल चौधरी, सरपंच प्रतिभा ठाकूर, देवनाऱ्याचे उपसरपंच राजेश भट, अनिल टेकाम, तुळशी गोपाले, बेनिप्रसाद धुर्वे सरपंच घनश्याम लोणारे माजी सरपंच वसंत तरटे माजी सरपंच बंडू रहांगडाले उपसरपंच रोहिदास मरस्कोले, प्रकाश लसुंते, गर्रा बघेडाचे उपसरपंच गोपीचंद गायकवाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गर्रा बघेडा ते पाहणारादरम्यान ४.८६ किलोमीटर चा रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रस्त्याची किंमत १९३.९९ लक्ष आहे. गावखेड्यांना मुख्य रस्त्याशी जोडल्याने विकासाचा मार्ग खुला होतो पुढील काळात गावातील रस्त्यांना मुख्य रस्त्याने जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. असे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
याप्रसंगी अजय गौरकर सुनील चौधरी रामेश्वर राहांग डा ले, अंगत चौधरी, कमलेश ठाकूर, सुहास तरटे, फकीर राऊत, मनीराम कोकोडे, मयाराम कटरे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.