मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वैनगंगा नदीवरील मुंबई -हावडा प्रमुख रेल्वे मार्गावरील रेल्वे पुलचे स्ट्रक्चरल (गुणवत्ता तपासणी) ऑडीट करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिल्याची माहिती आहे. माडगी (देव्हाडी) येथील नदीपात्रात ब्रिटीशकालीन व दुसरा भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम केलेले पुल आहे. १०० व ६० ते ६५ वर्ष दोन्ही पुलांना झाले आहेत. पुलाखालून अनेक पूर वाहून गेले. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतल्याची माहिती आहे.मुंबई - हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर माडगी (देव्हाडी) येथे वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. या पात्रात अप व डाऊन मार्गाकरिता दोन पुल तयार करण्यात आले. ब्रिटीशांनी दगडाचा पुलाचे बांधकाम केले. या पुलाला सुमारे १०० वर्षे झाल्याची दस्ताऐवजात नोंद आहे. सदर मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढली. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी दुसरा पुलाचे बांधकाम केले. दोन्ही पुल स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ठरले आहेत. अविरत रेल्वेसेवा या पुलावरून सुरु आहे. दोन्ही पुलाखालून आतापर्यंत अनेक पूर वाहून गेले, परंतु पुल जसेच्या तसेच डौलाने आजही उभे आहेत. रेल्वे प्रशासन दोन्ही पुलांची देखरेख व काळजी नियमित घेत आहे, परंतु सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाने गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सदर दोन्ही पुलाच्या बाजूला तिसरा पुल तिसऱ्या ट्रॅककरिता तयार करण्यात येत आहे. विस्तीर्ण नदी पात्र असल्याने येथे नामवंत बांधकाम अभियंत्यांचे पथक कार्यरत होते, हे विशेष.राष्ट्रीय महामार्ग बंदतुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गाची कामे संथगतीने मागील वर्षभरापासून सुरु आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आला आहे. देव्हाडा शिवारात वैनगंगा नदीकडे जाणारा पुल भूईसपाट करण्यात आला. नवीन पुलाचे काम सुरु आहे. येथील रपट्यावर तीन फुट पाणी वाहत असल्याने राष्ट्रीय महामार्ग सोमवार सकाळपासून बंद आहे.
रेती उत्खननाचा पुलाला धोकामाडगी येथील वैनगंगा नदी पात्रातील दोन्ही पुलाजवळील खांबाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. प्रचंड रेती उपस्यामुळे खड्डे पडल्याने पुलाला हादरे व धोक्याची शक्यता येथे बळावली आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. खबरदारी म्हणून रेल्वेच्या विशेष स्थापत्य अभियंत्यांनी येथे सूचना वरिष्ठांना कळविल्याची माहिती आहे.