तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : ऐन उन्हाळ्यात आलेली पोटनिवडणूक आणि वाढलेला पारा उमेदवारांना घाम फोडत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे प्रचाराचा वेग मंदावला आहे. परंतु पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सायंकाळच्या प्रचारसभा भरगच्च दिसत आहेत. तापमान वाढत असले तरी सभांना होणारी गर्दी त्यातुलनेत कमी नाही. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या प्रचार सभेत गर्दी पहावयास मिळत आहे. या गर्दीचे रूपांतर मतात वळविण्यात कुणाला यश येते, हे वेळच सांगेल.निवडणूक म्हणजे चुरस आणि स्पर्धा. परंतु वाढत्या तापमानापुढे कार्यकर्ते व नेते बाहेर पडायला धजावत नाहीत. निवडणुकीला अवधी कमी असल्यामुळे दिवसभर होणारे प्रचारसभा सकाळी व सायंकाळी आखण्यात आले आहे. सध्या कुकडे यांच्यासाठी वैयक्तिक भेटी टाळून संयुक्त प्रचारसभा घेण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय सभा व मोठ्या गावांमध्ये भेटी असे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. स्वत:हून आलेल्यांची गर्दी आहे की आणलेली हे मात्र समजण्यापलिकडे आहे. या गर्दीचा फायदा कुणाला होणार हेही निकालावरून स्पष्ट होईल. निवडणुकीच्या प्रचारसभांना गर्दी एकत्र करण्यासाठी त्या-त्या पक्षांना व्यवस्था व खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. त्यामुळे सभांना होणारी गर्दी ऐकणारी असेल तर याचा फायदा होणार हे सांगणे कठीण आहे. प्रचारसभांना येणारे लोक हे प्रचारक म्हणून काम करतात. त्यामुळे गर्दीपेक्षा दर्दीची संख्या जास्त असावी लागते. प्रचारसभांना होणारे गर्दीतील दर्दीवर उमेदवाराचा विजय अवलंबून आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपच्या प्रचारसभांना दिग्ग्जांची हजेरी लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे माजी पदाधिकाऱ्यांचे आकर्षण तर दुसरीकडे वर्तमान सत्ताधाºयांची रेलचेल दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी ही गर्दी सत्तांतर की पुन: सत्ता यावर अडकली आहे. भाजपकडून मंत्री व आमदारांचा ताफा रिंगणात उतरला असून राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा प्रफुल्ल पटेल व नाना पटोले यांच्यावर आहे. त्यांच्या भाषणातून जोरदार फटकेबाजी सुरु आहे. सत्ताधारी पक्षाकडून कामाची आकडेवारी सांगण्यात येत आहे. त्यामुळे सभांना होणारी गर्दी ही प्रत्यक्षात किती प्रमाणात मतांच्या रूपात वळतील यावर यशाचे गणित अवलंबून आहे.प्रफुल्ल पटेल यांचा झंझावातमाजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. तापमानाची पर्वा न करता मतदारांच्या ते भेटी घेत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद वाखाण्यासारखा आहे. हा प्रतिसाद मतांमध्ये रूपांतरीत झाला तर पोटनिवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. प्रफुल पटेल यांच्या नावात सेलेब्रिटीसारखे वलय आहे. त्यामुळे त्यांच्या जाहीरसभा असो किंवा सदिच्छा भेटी लोकांची गर्दी नेहमी दिसून येते. आता सुरू असलेल्या प्रचारसभांच्या गर्दीतूनही त्यांच्याकडून होणारी आपुलकीची विचारपुस मतदारांना सुखावणारी आहे. मागील निवडणुकीतील पराभवाचे शल्य न बाळगता त्यांची धडपड लोकांना आकर्षित करीत आहे. मागील चार वर्षांत ते सामान्य जनतेच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्याप्रती मतदारांमध्ये सहानुभूती आहे.
गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:03 AM
ऐन उन्हाळ्यात आलेली पोटनिवडणूक आणि वाढलेला पारा उमेदवारांना घाम फोडत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे प्रचाराचा वेग मंदावला आहे. परंतु पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सायंकाळच्या प्रचारसभा भरगच्च दिसत आहेत.
ठळक मुद्देप्रचारसभांना गर्दी : उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते प्रचाराला भिडले