शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

विदर्भासाठी संघर्ष सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 10:28 PM

आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे. शब्द पाळण्याची ताकद नेत्यांमध्ये नाही. मागण्या तशाच राहतात. घोषणा हवेतच विरतात. हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन पर्यटन केले जाते. गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जातो.

ठळक मुद्देमोहाडीत पत्रपरिषद : ज्वाला धोटे यांचा निर्धार

लोकमत आॅनलाईनमोहाडी : आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे. शब्द पाळण्याची ताकद नेत्यांमध्ये नाही. मागण्या तशाच राहतात. घोषणा हवेतच विरतात. हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन पर्यटन केले जाते. गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जातो. अधिवेशन संपले की हात पुसत निघून जातात असा आरोप ज्वाला धोटे यांनी करत आता विदर्भासाठी संघर्ष चालूच राहणार, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कान्हळगाव (सिर) येथे महिलांचे कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी त्या आल्या होत्या. मोहाडी येथील विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विदर्भासाठी लढणारे जांबुवंतराव धोटे यांची कन्या ज्वाला धोटे म्हणाल्या, सध्याचे सरकार मार्केटिंग करीत आहे. स्वप्न दाखवून भुरळ पाडत आहे. त्या स्वप्नांना आकार देणे व साकारणे महत्वाचे असते. पण ते होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या जाहीरनाम्यात विदर्भ वेगळा देऊ असे सांगितले गेले. विदर्भाच्या जनतेनेही साथ दिली. पण, सत्तेत येताच विदर्भावर बोलणे टाळले जात आहे.विदर्भाची निर्मिती होण्यासाठी जनतेची उत्साह स्फूर्ती शमली नाही. जांबुवंतरावांचे त्याग, बलिदान हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी पूंजी आहे. ते माझे आदर्श असून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत विदर्भाकरिता लढा दिला असे सांगून या आंदोलनात अनेकजण जुळले आहेत. विचारांनी वेगळा विदर्भ व्हावा. आता टायगरची सिंहगर्जना होतच राहील. संघर्ष आपल्या रक्तात आहे. विदर्भासाठी लढा राहणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले. आईकडून राजकारण शिकलो अन् रक्तातच समाजकारण आहे. माझ्या वडीलांनी सत्ता अन् पदाची पर्वा केली नाही. ते जनतेच्या भल्यासाठी लढत राहिले. मनसे, शिवसेना विदर्भासाठी विरोध करतात. पण हे ठरविणारे कोण असा प्रश्न करून वेगळ्या विदर्भासाठी जनताच ठरवेल. मंचावरून बोलणे सोपे असते. त्यासाठी त्याग, संघर्ष, बलिदान, उपोषणही करावी लागतात. आज विदर्भ बेरोजगारी, विदर्भासाठी लढत झुंजत आहे. आता रस्त्यावर सगळ्यांनी उतरले पाहिजे. बाहेरच्या पाहुण्यांनी खपवून घेणार नाही. विदर्भासाठी शासनापुढे झोळीही पसरविणार नाही, असेही ज्वाला धोटे यांनी ठणकावून सांगितले.कबड्डी खेळाबाबत बोलताना त्या म्हणाल्या कबड्डी शांत डोक्याचा खेळ आहे. या खेळात महिला समोर येत असल्याचा आनंद व्यक्त करीत शासनानी ग्रामीण भागातील खेळाडूंना सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपण टेनीसपटू, बॅडमिंटन, कबड्डी आदी खेळात प्राविण्य मिळविले आहे, असे ज्वाला धोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी असलम खातमी, सरपंच मेघा उटाणे, उपसरपंच राजू उपरकर,अनुप उटाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.