आमदार आदर्श योजना : अनिल सोले यांनी घेतले रोंघा दत्तक मोहन भोयर तुमसरआमदार आदर्श गाव योजनेत तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल रोंघा या गावाची निवड नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघातील आमदार अनिल सोले यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असून नागपूर जिल्ह्याच्या सीमा जुळून आहेत. प्रधानमंत्र्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात हे गाव येण्याकरिता धडपड सुरू आहे.खासदार व आमदारांनी आदर्श गाव संकल्पना राबवून गावांचा विकास करावा, अशी घोषणा करण्यात आली होती. अविकसीत गावाचा कायापालट व्हावा हा उदात्त हेतू या योजनेचा आहे. तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल रोंघा या गावाची निवड नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार प्रा.अनिल सोले यांनी केली. तुमसर शहरापासून हे गाव ३५ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव भंडारा जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. सातपुडा पर्वत रांगात जंगलव्याप्त परिसरातील रोंघा या गावाची आ.सोले यांनी निवड केली. विकासापासून दूर अशी या गावाची ओळख आहे. हे गाव विकसित करण्याचा निर्धार आ.सोले यांनी केला आहे.या गावाची लोकसंख्या १,८२६ इतकी असून भूमिहिन, शेतमजुरांची संख्या सर्वाधिक आहे. ग्रामपंचायत असून जिल्हा परिषदेची १ ते ७ ची शाळा गावात आहे. दहावीपर्यंत खासगी शाळा आहे. या गावाला आ.सोले यांनी २५ लाखांचा निधी दिला. आत्माअंतर्गत शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला. गावात समाधान शिबिर घेण्यात आले. यात संपूर्ण गावाचे नियोजन करण्यात आले. यावेळी आ.अनिल सोले, आ.चरण वाघमारे उपस्थित होते.गावाचा समतोल विकास साधणे, विकास कामे करणे व स्वत:च्या पायावर ग्रामस्थांना कसे उभे राहता येईल याकरिता गाव विकसीत करण्याचा संकल्प आहे. कामे करीत राहा हाच एकमेव हेतू आहे.- प्रा. अनिल सोले,सदस्य, पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग.
रोंघा गावाची ‘मन की बात’ मध्ये येण्यासाठी धडपड
By admin | Published: December 22, 2015 12:38 AM