मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी आपल्या आसनावर दहावीतील पीयूष विजय लेंडे या विद्यार्थ्यास बसविले. एक कदम आगे या नावाने दहावीची सराव परीक्षा घेण्यात आली. या सराव परीक्षेत पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यास मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसण्याचा सन्मान थँक्स अ टीचर या उपक्रमाच्या माध्यमाने मिळेल अशी घोषणा शाळेने केली होती. शनिवारी स्वयंशासन कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये घेतला गेला. त्यात एका दिवसाचे मुख्याध्यापकपद पीयूष लेंडे या विद्यार्थ्याला सोपवून नेतृत्व करण्याची संधी मिळवून दिली. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना अभिप्रेत करण्याचे साधन शाळेचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांना शाळेतील प्रशासनाची जवळून माहिती व्हावी यासाठी प्रशासनिक कारभार शाळेने विद्यार्थ्यांवर सोपविला होता. सगळी सूत्रे एका दिवसांसाठी विद्यार्थ्यांनी हाती घेतली होती. विद्यार्थ्यांनी अध्यापनाच्या पाच तासिका घेतल्या. यात रुपाली पडोळे, विशाल आंबीलकर, मिताली बाळबुधे, राजश्री बुधे, अभिलाषा भडके, सानिका लेंडे, जान्हवी डोकरीमारे, जान्हवी भोंगाडे, नाविन्य मलेवार, दिव्यांनी डोकरीमारे, स्नेहा चकोले, सोनाली तलमले, एकलव्य लेंडे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कार्य केले. तसेच लिपीकाचे कार्य निलेश कढव तर परिचराचे काम प्रणय गाढवे या विद्यार्थ्याने केले.
हजेरी पटावर स्वाक्षऱ्या, शिक्षकांच्या अध्यापनाचे निरीक्षण करून लॉग बुक कसे लिहितात. सुट्ट्यांची नोटीस कशी काढतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कशी पाठवली जाते याची विद्यार्थ्यांना माहिती करून घेता आली. यासाठी सहायक शिक्षक हंसराज भडके, हेमराज राऊत, गजानन वैद्य, हितेश सिंदपुरे, गोपाल मडामे, शोभा कोचे, शिखा सोनी तसेच विज्ञान सहायक मोहन वाघमारे, परिचर श्रीहरी पडोळे यांनी मदत केली.
कोट
शाळेने थँक्स अ टीचर उपक्रमाच्या माध्यमाने नेतृत्व प्रक्षेपित व प्रतिभा निर्माण करण्याची संधी दिली. त्यामुळे योग्यता सिद्ध करता आली. अशा उपक्रमाततून विद्यार्थ्यांना प्रेरणा स्वाभाविकपणे मिळत जाते.
विशाल आंबिलकर
विद्यार्थी
040921\img_20210904_105621.jpg
थँक्स अ टीचर उपक्रम : मुलांच्या हातात प्रशासन